सातगावचे 600परिवार बेघर होण्याची आली पाळी कोन वाचविणार ? 20 वर्षा पासून अतिक्रमण जागेवर करीत आहे निवास.
-सातगाव गावातील सरपंच यांचा डाव..असल्याचा पत्रकार परिषद मध्ये आरोप
-नरेंद्र मोदी यांच्या घरांचे स्वप्न होणार क़ाय भंग
टीपभ नागपुर – देशाच्या पंथ प्रधान यांचे स्वप्न प्रत्येकाला घर,2023 मध्ये सर्वांना घर देण्याचे ही सरकार चे धोरण आहे मात्र असे असतांना नागपुर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पासून काही अंतरावर असलेले सातगाव येथील तब्बल 6 परिवारांवर बुलडोजर चालण्याची वेळ प्रशासनाने आनली.20 वर्षा पासून निवास करणारे गरीब परिवार कुठे राहणार असा सवाल सातगाव येथील नागरिकांनी बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केला.
या संदर्भात जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र जिलाधिकारी यांनी सुद्धा जागा खाली करा असेच म्हटले असे ही सातगाव वासियांनी सांगितले.आरोप आहे की गावातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या ऐका बड्या नेत्याचा या मागे हात आहे.20 वर्षा पासून काही अड़चन नाही मग आताच का ?असा ही प्रश्न त्यांनी केला.
पुढे म्हणाले की ग्रामपंचायत सातगाव वेणा येथील शासकीय जागेवरील ( ६०० ) झोपडपट्टीला नियमानुकूल ( नियमित ) करण्या करिता गावकर्यांनी शासन निर्णय क्र.प्रआयो -२०१७ / प्रक .३४८ / योजना दिनांक १६/०२/२०१८ २ ) शासन निर्णय क्र . प्रआयो -२०१८ / प्रक .२५६ / योजना १० दिनांक ०२/०८/२०१८ ३ ) शासनाचे सम क्रमांकाचे पत्र दि .०५ / ११ / २०१८ ४ ) शासनाचे सम क्रमांकाचे पत्र दि . १ ९ / ११ / २०१८ ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही काही फायदा होत नसल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ट केले मात्र तिथे ही त्यांना निराशा हाती लागली.म्हणून शेवटी निराश झालेल्या गावकर्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली आपबीती सांगितली.
२००२ पासून सदर गावात वास्तव्यास आहेत
जवळपास २० वर्षा कालावधी लोटून सुद्धा सदर झोपडपट्टी नियमानुकूल करण्यात आलेली नाही . हिंगणा तालुक्यातील किरमिटी भारकस वरील शासने माननीय तहसीलदार साहेब यांच्याद्वारे पट्टे वाटप करण्यात आले . शिरुड व टाकळघाट हे गाव हिंगणा तालूक्यात येत असून , तसेच यांना सुद्धा पाणी कर व मालमत्ता कर शासन नियमानुसार लावण्यात आलेला आहे . परंतु सातगावाला पट्टे वाटप करण्यात आले नाही ही शोकान्तिकाच म्हणावे लागेल .अजुन पर्यंत पाणी कर , मालमत्ता कर लावण्यात आले नाही .
गामपंचायत सातगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी नागरिकांना उटवण्याकरिता वारंवार नोटीस देत आहेत . व जागा खाली करण्याकरिता दबाव आणत असल्याचे ही सांगितले.
हिंगणा मतदार संघात गाव असल्याने आमदार समीर मेघे,चन्द्रशेखर बावनकूले यांना ही निवेदन देवून घर वाचविन्याची विनंती केली मात्र काही उपयोग झाला नाही.प्रधान मंत्री यांच्या घरांचे स्वप्न भंग होतांना दिसत आहे.आता या 6 च्या वर परिवाराला कोंण मदत करेल की नागरिकांच्या घरावर बुलडोजर चालेल या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे….सातगाव वासियांची एकच मागणी आहे की आम्हाला घर द्यावे तेव्हाच आम्हाला हटवावे.जो पर्यंत घर मिळणार नाही तो पर्यंत हटनार नाही असा इशारा नागरिकांनी पत्रकार परिषद मध्ये दिला.