5 दिवस बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान सफारी बंद
नागपुर– राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपुर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या ५० विदेशी पाहूण्यांनी गुरुवार, दि. २१-०९-२०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यानातील सफारीचा पावसाच्या साक्षीने आनंद लुटला. जोरदार पावसाच्या वातावरणातही गोरेवाडा उद्यानातील प्राण्यांनी परदेशी पाहूण्यांना मनसोक्त दर्शन दिले.मात्रा आता
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणि उद्यान, नागपुर पावसाळोत्तर देखभाल-दुरुस्ती आणि अधिवास व्यवस्थापन विषयक कामानिमित्त दि. २५ सप्टेंबर २०२३ ते ३०सप्टेंबर २०२३ या काळात पर्यटकांकरिता बंद राहील.
उद्यान १ ऑक्टोबर २०२३ पासून पर्यटकांसाठी नियमित सुरू राहील. सोमवार दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी साप्ताहीक सुट्टीदिवशी महात्मा गांधी जंयती निमित्त येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीसाठी उद्यान पर्यटकांकरिता सुरू राहील. कृपया सर्व पर्यटक आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहीतीसाठी उद्यानाचे अधिकृत संकेतस्थळ www.wildgorewada.com संपर्क साधावा.