अ . भा . अंनिसचे आव्हान न स्वीकारताच दिव्यशक्ती’चा दावा करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी काढला पळ..! तक्रार नोंदवूनही गुन्हा दाखल नाही, विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अ.भा . अंनिसचा आंदोलनात्मक पवित्रा, आयोजकांवरही कारवाईची मागणी
नागपूर प्रतिनिधी WH NEWS ) : ‘ दिव्यशक्ती ‘ असल्याचा दावा करणारा २६ वर्षीय तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपूरच्या रेशीमबाग मैदानातून पळ काढला आहे . जादूटोणा विरोधी कायद्यानुसार या धीरेंद्र कृष्ण महाराजावर तातडिने गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार , कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष आणि अ.भा. अंनिसचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे .
नागपूरच्या टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा . श्याम मानव म्हणाले की , धीरेंद्र कृष्ण , बागेश्वर धाम , जिल्हा छत्तरपुर , मध्य प्रदेश यांनी दिव्य दरबारात केलेल्या ‘ चमत्कारिक दाव्यासंबंधी ‘ ‘ जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमेडिज अॅक्ट १ ९ ५४ या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा ठरू शकणारे दिव्य दरबार व्हिडिओज ‘ ( युट्युब वर उपलब्ध असलेले ) मधील सारे पुरावे लिखित स्वरूपात व व्हिडिओ स्वरूपात दि . ८ जानेवारी २०२३ ला कार्यवाही करण्याच्या विनंतीसह सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री . रोशन पंडित यांच्याकडे दिले होते . जादूटोणा विरोधी कायद्यासाठी समन्वयक दक्षता अधिकारी म्हणून शासनाने सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे .
घडू पाहणारा गुन्हा प्रतिबंधित करण्याचा , थांबवण्याचा आणि झालेल्या गुन्ह्याची तक्रार दाखल करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी दक्षता अधिकाऱ्यांकडे ( जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधी ) असते . – पोलीस आयुक्ताची भेट दि . १० जानेवारी २०२३ ला नागपूरचे पोलीस आयुक्त श्री . अमितेश कुमार यांना प्रत्यक्ष भेटून धीरेंद्र महाराजांच्या चमत्कारिक दाव्यांची कायद्यानुसार तो कसा गुन्हा ठरतो यासंबंधी सविस्तर माहिती जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष या नात्याने श्याम मानव यांनी दिली आणि कठोर कार्यवाहीची अपेक्षा विशद केली आहे .
नागपूरच्या दिव्य दरबाराची चित्रफीत सादर ! दि . १० जानेवारी २०२३ ला नागपूरच्या रेशीमबाग परिसरात धीरेंद्र कृष्ण यांनी आयोजित केलेल्या दि . ७ व ८ दिव्य दरबाराची चित्रफीत सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्याकडे नव्या अर्जासह सादर केली . याही चित्रफीतीत धीरेंद्र कृष्ण यांनी नाव , वडिलांचे नाव आपोआप दिव्यशक्तीने ओळखल्याचा दावा केलेले पुरावे आहेत . ते पुढीलप्रमाणे- ‘ बागेश्वर धाम सरकार का दिव्य दरबार जानेवारी २०२३ सुबह ९ बजे से ‘ ( वेळ : २:५८:३८ ) या मथळ्याखाली व्हिडिओ युट्युब वर प्रसारित झाला आहे , उपलब्ध आहे .
यात जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट चे उल्लंघन करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत . हा व्हिडिओ व त्यातील पुराव्यांकडे पुन्हा सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांचे लक्ष वेधण्यात आले . पुरावे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . ‘ भूत बाधा की सवारी आती है , उपद्रव किया गया है , गंदी तांत्रिक क्रिया है ‘ ( १.१०.४० से १.११.२८ ) . ” तबियत ठीक नहीं रहती , तात्काळ मृत्यू , अभी तक घर मे ५ मृत्यू हुई है , पितृदोष के कारण …. ( ५५ मिनीटसे ) . ‘ आपके पिता का नाम शंकर लाल है । माईक से बोले या सब नही तो हम तुम्हारे सारे कांड खोल देंगे ‘ ( १.४० ते १.५६ ) . असे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत . अ.भा. अंनिसचे दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान • अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धीरेंद्र कृष्ण यांना केले.
आपोआप नाव , वय , मोबाईल नंबर ओळखून दाखवा , शेजारच्या रूम मधील दहा वस्तू ओळखून दाखवा व चित्रफित केलेल्या दाव्यानुसार दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध करून ३० लाख रुपयांचे पारितोषिक जिंका , असे आव्हान दिनांक ९ जानेवारी २०२३ ला टिळक पत्रकार भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले होते . सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) या प्रकरणाचा अभ्यास करून तयारी करत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे . धीरेंद्र कृष्ण यांचा कार्यक्रम दि . ५ ते १३ जानेवारीचा प्रसिद्ध झालेला आहे . तसे पोस्टर्स , फलक लागले , पत्रिका ही वाटण्यात आल्या आहेत .
दोन दिवस आधीच पळ काढला ! धीरेंद्र कृष्ण काहीतरी निमित्त करून दि . ११ जानेवारीला संध्याकाळी २ दिवसांचा कार्य क्रम अर्धवट टाकून , नागपूर सोडून निघून जाणार असे कळले होते . तशी कल्पना सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांना दि . १० जानेवारीला रात्री ९ वाजता दिली होती . पळून जाण्याच्या आधी कार्यवाही करा , अशी विनंती करण्यात आली होती . धीरेंद्र कृष्ण नागपूर सोडून जाण्याच्या आधी दि . ११ ला संध्याकाळी पुन्हा सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांना फोन करून आणि पोलीस आयुक्त नागपूर यांना एसएमएस व व्हाट्सअप मॅसेजद्वारा कल्पना दिली व कार्यवाही करण्याविषयी सुचवले होते .
पण शेवटी धीरेंद्र कृष्ण नागपूर सोडून गेले . पोलिसांची कार्यवाही होण्याआधीच आणि अ . भा . अंनिसचे ३० लाखांचे ‘ दिव्यशक्ती ‘ सिद्ध करण्याचे आव्हान न स्वीकारताच दोन दिवसांचा कार्यक्रम अर्धवट टाकून त्यांनी पोलीस कार्यवाहीच्या भीतीने पळ काढला की , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३० लाखांच्या दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हानामुळे पळ काढला की कुणीतरी पळवले अशी चर्चा जनता करत राहील . सोबतच अशा भोंदू बाबांचे कार्यक्रम आयोजित करून सामान्य नागरीकांना अंधश्रद्धेत ढकलणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी , अ.भा. अंनिस करीत आहे . 2 नागपूर पोलखोल शहर ! दिव्यशक्ती स्वत : असल्याचा दावा जाहीररीत्या करणारा धीरेंद्र कृष्णांनी पळ काढला असल्यामुळे ते भोंदू आहेत , हे सर्व जनतेने ओळखावे व स्वत : ला फसवणुकीपासून वाचवावे . दिव्यशक्तीच्या दाव्यांना फसू नये , असे आवाहन अ . भा . अंनिस करते आहे . पुन्हा एकदा नागपूरने ‘ पोलखोल शहर ‘ ही ओळख सिद्ध केली आहे . माध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अ . भा . अंनिस आणि जागृत जनता आभार व्यक्त करते आहे .
19 जनवरी का भांडाफोड़ सभा –अंधश्रद्धा फैलवणाऱ्या भोंदू बाबा यांचा भंडाफोड़ करण्या करिता अनीस ने 19 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता गुरुदेव सेवाश्रम रमन साइंस जवळ शुक्रवारी तालाब येथे भांडा फोड़ सभेचे आयोजन केले आहे.कसा होईल भांडाफोड़ बघण्यास यावे .