हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करा ◾️आमदार विनोद अग्रवाल यांची विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

spot_img

100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करा

◾️आमदार विनोद अग्रवाल यांची विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गोंदिया : वीज बिलाच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांची कंबरडे मोडणारी असून वीज बिल भरताना वीज ग्राहकांची दणछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. तेव्हा सरकारने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे, अशी मागणी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तर तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Advertisements

महाराष्ट्र राज्यात सध्या सरकारचे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ज्यामध्ये राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून त्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडली बहना योजनाʼ सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकड़े केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ‘लाडकी बहिण योजनाʼ जाहीर केली, त्याचा लाभ राज्यातील पात्र बहिणींना होणार आहे. मात्र, दुसरीकडे घरगुती वीज बिलाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. अनेक संघटनांकडून वीज दर कमी करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला जात आहे. दरम्यान, याला प्राधान्य देत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज बिलात सवलत देण्याची विनंती करत 100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे.

तर त्या संदर्भात एक पत्रही मुख्यमंत्र्याना सुपूर्द केले आहे. या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जा विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

◾️शासनाच्या ‘त्याʼ निर्णयाचे आभार

Advertisements

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करीत असून घरगुती विजेच्या बाबतीत 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलाच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.

विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया
००००००००००००