६ नोव्हेंबर रोजी रोजगार आंदोलनाची महत्वपूर्ण बैठक..! युवकांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – किरण गुडधे
अमरवती : नौकरभरती आणि उद्योग यासाठी केंद्र व राज्य सरकारचा कोणताही आकृतीबंध नाही. त्यामुळे कंत्राटी नौकरभरतीवर जोर दिल्या जातो. एकीकडे सरकारद्वारे नौकरभरतीच्या पोकळ घोषणाबाजी होत असतांना दुसरीकडे सुरु होत असलेली नौकरभर्ती सुद्धा रद्द केली जाते तसेच मोठे उद्योग दुस-या राज्यात पळविले जातात. त्यामुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात येत असुन दिवसेदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. बेरोजगार, तरुणांनीच आता समोर येवुन शासनाला नौकरभरती व उद्योग निर्मितीसाठी आग्रह करावा लागेल.
संयुक्त रोजगार आंदोलन समिति द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपुर्ण देशात देशव्यापी रोजगार आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची तयारी व पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता शासकीय विश्राम भवन, चपरासी पुरा, अमरावती येथे रोजगार आंदोलनाच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व बेरोजगार, युवक, युवती आणि सामाजिक चळवळीत काम करणा-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तसेच याबाबत अधिक माहीतीसाठी ७७६९९४४२४५ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मा. किरण गुडधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.