हिंगणा विधानसभा काँग्रेसला द्या -बैस
नागपुर – जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा सध्या भाजपाचा आमदार आहे.यापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस च्या हातात होता.रमेश बंग हे मंत्री सुद्धा राहिले. मात्र सतत दोन तीन वेळा राष्ट्रवादी कांग्रेस ला हार मनावी लागली.
पुढे ही अशीच स्थित राहिली तर पुन्हा भाजपा कब्जा करु शकतो.भाजपच्या हातून हिंगणा विधानसभा हिसाकवून घेण्या करिता ही जागा कांग्रेस ला देण्यात यावी असा सुर आता कांग्रेस कार्यकर्त्यांकडून बोलेल्या जात् आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अश्विन बैसने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रीय युवक काँग्रेस चे प्रभारी कृष्णा अल्वरू,राष्ट्रीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास बी वी,प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कड़े चक्क मागणी केली. यावर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन देत मतदार संघ आपल्या कडेच राहील अशी ग्वाह दिली.जर असे झाले तर मग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिचे क़ाय ?पूर्व परंपरागत हिंगणा सीट राष्ट्रवादी सोडले क़ाय?महाविकास आघाडी जर झाली तर मग जागेवरुन कांग्रेस राकांपा मध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.