हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीचे विद्यार्थ्यांसह पालकांना शासकीय शैक्षणिक सुविधांचे मार्गदर्शन
हिंगणा –” परीक्षेच्या तोंडावर महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शालेय फीस साठी मानसिक त्रास दिल्यास हुमन राईट प्रोटेक्शन फोरम विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देण्यास सज्ज ” – आशिष फुलझेले, सचिव मानव अधिकार संरक्षण मंच
बौध्द हक्क परीषद, हिंगणा येथे हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासणाच्या योजना तथा सोई सुविधा यावर संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले, प्रसंगी तथागत गौतम बुध्द , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , संत रविदास महाराज यांना अभिवादन करुन संवादाची सुरुवात झाली.
हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीचे संचालक महेश वासनिक यांनी संत रविदास महाराज जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन प्रास्ताविक केले त्यानंतर विद्यार्थी मित्र, मानव अधिकार संरक्षण मंचाचे सचिव आशिष फुलझेले यांनी उपस्थितीतां कडून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत, शैक्षणिक सुविधांच्या माहितीचा अभाव त्यामुळे विद्यार्थी आर्थिक शोषणाचे बळी ठरताय त्यावर उपाय योजना व संघर्षरत लढ्यात आपली जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
प्रसंगी बौध्द समाज ऐकता परीषदेचे अध्यक्ष सुरेश मानवटकर, जय गुरुदेव सेवा मंडळाचे सुरज आप्तुरकर, प्रमोद जयसिंगपूरे, क्रांतीसुर्य युवा ग्रुप चे अध्यक्ष राकेश रामटेके, अन्नाभाऊ साठे संस्थानाचे अध्यक्ष केशव डोंगरे, संत रविदास गुरुकुल चे अध्यक्ष क्रिष्णा बोदिलखंडे, बौध्द हक्क परीषदेचे सचिव तेजराव मुन, आय.टी.आय. चे सेवानिवृत्त प्रिसीपल ज्ञानेश्वर कांबळे, अंकीत थुल यांच्यासह परीसरातील विद्यार्थी पालक उपस्थित होते, आभार- मानव अधिकार संरक्षण मंच हिंगणा शाखेचे प्रणय अडीकाने यांनी केले.
संवादाच्या सफलतेसाठी बंडू वानखेडे, प्रशांत दिवे, अमोल रामटेके, रवींद्र हुमने, लोकेश काटोले, होमेश्वर नानवटकर, रुषभ जयसिंगपूरे, आनंद धनविज, भिमराव मोडक, देवा कुरील, प्रधान, सुयोग कोठारे, कटवे यांनी परीश्रम घेतले.