हरिनाम गजरात पचखेडी नगरीत भक्तिमय अखंड भागवत सप्ताह
कुही (गुरुदेव वनदुधे) – तालुक्यातील पचखेडी येथे सात दिवशीय हरीनाम सप्ताह पार पडला यामध्ये ह.भ प संदिप तायवाडे महाराज यांच्या वानितुन सात दिवस नागरीकांनी अखंड भागवत सप्ताहाचा लाभ घेतला यावेळी सात दिवस सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान प्रभातफेरी काढून गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले सरतेशेवटी काल दिनांक ९/12/2022 रोजी सकाळी सात ते बारा वाजेच्या दरम्यान घोडे रथ. राम. लक्ष्मण. सिता हनुमान. अश्या विविध भगवंताच्या वेशभूषेत रथयात्रा काढीत अख्खे गाव भक्तिमय वातावरणात न्हावुन निघाल्याचे चित्र पहावयास मिळाले .
या सात दिवसात रोज सकाळी सात ते अकराच्या दरम्यान रथ यात्रा काढीत गावात दारुबंदी. स्वच्छता. हागणदार मुक्त यावर रामधुन काढीत गावाला एकतेचा संदेश दिला या कार्यक्रमात सात दिवस अख्ख्या गावांनी ऱ़गगरांगोळी पुष्पगंध देत आपल्या दारी साक्षात देवच अवतरला या भावनेतून पचखेडी नगरी वासियांनी रामधुन चे स्वागत केले.या कार्यक्रमाला विविध जाती धर्मातील गावातील नागरिक माजी सरपंच दिलीप भोयर पाटील. सामाजिक कार्यकर्ते गुणवंत लांजेवार. राधेश्याम लांजेवार. तंटामुक्ती अध्यक्ष गोलु शेंडे. नितेश काळे.
शैलेश ढोरे. अभिमन खराबे. विनोद वैध. किशोर धांडे.गजानन सोनवाने. ज्ञानेश्वर टांगले. रामदास आस्वले. वसंता भोयर. लंकेश भजनकर. आशिष निकुळे. विशाल राघोर्ते. प्रज्वल टांगले. वैभव ढोरे. निशांत केवट हर्षल ढोरे. स्वप्नील भोयर. बंटी कांबळे. प्रफुल कडुकार. राकेश राघोर्ते. संजय कडुकार .मिलींद शेंडे. विकास आस्वले. सुमीत भजनकर. राहुल भुसारी. नरहरी लांजेवार .खुशाल मुळे. यांनी अथक परिश्रम घेतले