सुशासन सप्ताह निमित्त तंबाखूमुक्त अभियान
गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू मुक्त आरोग्य अभियान आणि जिल्हा सुशासन प्रशासन सप्ताह
अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दिनांक 23 डिसेंबर पासून तंबाखू मुक्त युवकांसाठी मौखिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे. या कॅम्पला मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, मनो चिकित्सा अधिकारी डॉ. सुरेखा आझाद मेश्राम, दंत चिकित्सक डॉ. नाकाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर म्हणाल्या भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी बाजपाई यांच्या स्मृतीमध्ये दर वर्षी प्रमाणे 23 डिसेंबर पासून
सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताह निमित्ताने आरोग्य विभागातर्फे नाविन्यपूर्ण कॅम्प मध्ये टोबॅको फ्री सोसायटी निर्माण करण्यासाठी केटीएस येथील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सेलचे अधिकारी, कर्मचारी गोंदिया जिल्हाभर विविध कॅम्पेन राबवून जनजागृती करीत आहेत. या वेळी मनोचिकित्सक डॉ सुरेखा आझाद मेश्राम यांनी अडीकॅशन फ्री युथ संकल्पना विस्ताराने समजावुन सांगितली व गुटखा खाल्ल्यामुळे 85% युवकांचे तोंड उघडत नाही हे वास्तव असल्याचे सांगितले. या नाविन्यपूर्ण कॅम्प साठी जिल्हा मौखिक आरोग्य सेलच्या पथकाने सहकार्य केले.