सीमा तायडे ( दुधे ) यांना पीएच.डी. प्रदान
नागपुर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत कॅप्टन सीमा तायडे ( दुधे ) सहा . शारीरिक प्रशिक्षण निर्देशक ( पी.टी.आय. क्रीडाविभाग ) व एन.सी.सी. अधिकारी यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली .
त्यांनी ” पदवी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्याचा तुलनात्मक अभ्यास ” या विषयावर डॉ . राजेंद्र बहाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये शोध प्रबंध सादर केले . त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पती श्री किशोर तायडे व मुलगी कु . श्रेया तायडे सह आदींना दिले .