हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

सलंग्न करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठवा..! नागपूर शिवसेना महिला आघाडी तर्फे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन सादर

spot_img

सलंग्न करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठवा..!

नागपूर शिवसेना महिला आघाडी तर्फे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन सादर

नागपूर : नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना जिल्हा प्रमुख सौ.मनीषा पापडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नुकतंच पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी यांना मूळ ठिकाणी पाठविणबाबत नुकताच जी आर प्रसिद्ध केलेला आहे. परंतु आत्तापर्यंत CP, SP यांनी पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्या आदेशाच पालन केलेले नाही. आत्तापर्यंत कुठलाही अहवाल दिलेला नाही.

नियम नसतांना सुद्धा आत्तापर्यंत पोलीस खात्यामध्ये ठाणेदार यांचा आर्थिक कारभार बघणारे, आदेशाचे पालन करणारे अधिकारी, पोलीस अंमलदार कित्येक वर्षापासून एकाच ठाण्यामध्ये अटॅच केलेले आहेत, काटोल येथील पोलीस निरीक्षक यांनी सुड बुद्धीने महिला अंमलदार हिला लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमध्ये पोलीस मुख्यालय येथे अटॅच केले परंतु पोलीस महासंचालक यांचे आदेश येऊन सुद्धा आत्तापर्यंत पोलीस अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठविण्यात आलेले नाही.

Advertisements

जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, गोंदिया शिवसेना पदाधिकारी दीप्ती मिश्रा यांनी पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेऊन अटॅच केलेले अधिकारी अंमलदार यांना मूळ ठिकाणी पाठविणबाबत विनंती केली. पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया अपवादत्मक परिस्थितीमध्ये प्रशासकीय निकड समजून घटक स्तरावरील व परिक्षेत्रीय स्तरावरील आस्थापना मंडळ यांनी वार्षिक सार्वत्रिक बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर बदली पात्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्वरित विहित मुदतीत बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे.

त्यासंबंधीचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना यांनी नुकतीच CP/ SP वरिष्ठ पर्यवेशीय अधिकारी, Range IGP यांना दिलेले आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठलीही कारवाई या संबंधित विषयावर केलेली नाही, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बदली झाल्यानंतर इतर ठिकाणी Attach करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नाही तरीसुद्धा पोलीस अधिकारी आपल्या आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरिता मर्जीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना अनेक वर्षे Attach करून कामे करून घेतात काही पोलीस अधिकारी पोलीस महिला अंमलदारावर द्वेष भावनेतून इतर ठिकाणी Attach करतात हे चुकीचे आहेत.

कुठलाही कायदा नसतांना व प्रशासकीय तरतूद नसतांना सुद्धा अटॅच प्रणालीमुळे अनेक अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास पोलीस खात्यामध्ये होत आहे. वंदना वासुदेव खेडकर बक्कल नंबर 1846 पोलीस स्टेशन काटोल यांना सुद्धा पोलीस मुख्यालय येथे गेल्या सहा महिन्यापासून Attach करण्यात आले त्या संबंधितचे पत्र सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पावसाळी अधिवेशनात दिलेले होते. वरिष्ठांचे आदेश येऊन सुद्धा आजपर्यंत वंदना वासुदेव खेडकर बक्कल नंबर 1846 यांना पोलीस मुख्यालय येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तसेच त्यांना त्वरित मूळ बदली ठिकाणी हजर सुद्धा करण्यात आलेले नाही, आपण या विषयाची सखोल चौकशी करून ताबडतोब कारवाई करून निवेदना मार्फत करण्यात आली. असे प्रसिद्धी पत्रकात मनीषा पापडकर यांनी कळविले आहे.

Advertisements