सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 26 मार्च ला…धर्मदाय आयुक्तांचे आदेश..संस्था करणार पालन…पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती
तिपभ नागपूर – सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती , नागपूर , तर्फे रविवार दिनांक २६ . ०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कुसुमताई वानखेडे सभागृह ” , उत्तर अंबाझरी रोड , नागपूर ४४००१०. येथे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये एड बाबर यांनी दिली .
तरी इच्छुक मुला मुलींनी विवाह करिता खालील नमुद केलेल्या पदाधिकाऱ्याकडे दिनांक १०.०३.२०२३ पर्यन्त संपर्क साधावा . या सोहळयात प्रामुख्याने आदिवासी , आत्महत्याग्रस्त शेतकरी , शहिद जवान , करोनामुळे मृत्यू पावलेल्या इसमांची मुले , बेघर , पारधी समाज गरीब – गरजू , उस – तोड कामगार , भटक्या जमाती , विमुक्त जाती , अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले / मुली व अनाथ मुले मुली इत्यादींचा सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येईल .
घटस्फोटीत पुरूष अथवा स्त्री यापैकी विवाह सोहळयामध्ये विवाह करण्यास इच्छुक असलेल्या जोडप्यांबाबतचे न्यायालयाकडून अथवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडूनच घटस्फोट झालेला असल्याबाबतचे कागदपत्रे यांची पडताळणी केल्यानंतरच , या संवर्गातील इच्छुक मुला – मुली चे विवाह करण्यात येतील . वरील सोहळा पार पाडण्यासाठी सार्वजनिक संस्थांनी तसेच इच्छुक व्यक्तींनी जास्तीत जास्त निधि नगदी अथवा वस्तु स्वरूपात देऊन वरिल सोहळा प ार पाडण्यास सहकार्य करावे असी विनंती आयोजकांनी केली.
संपर्काचा पत्ता : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय , सिव्हिल लाईन्स , नागपूर . अॅड . अमृत य . वाघ अध्यक्ष “ सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती ” , नागपूर . मो . नं . ९ ४२२८२७७७६
एड.वाघमारे , अॅड . दिप्ती पं . तिडके सचिव सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती , नागपूर . मो . नं . ९ ८ ९ ०५६७०६८ प्रसाद व राजवैद्य, कोषाध्यक्ष सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती , नागपूर . मो . नं . ९ ८ ९ ०४४ ९९ ०१ यांच्या सोबत संपर्क साधु शकता.