“सरकारला जागे करण्यासाठी भीमशक्तीचे भजनी आंदोलन
सोलापूर – डिसेंबर 2024 ला परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना काही जातीवादी लोकांकडून करण्यात आली आणि त्या निषेधार्थ परभणी या ठिकाणी आंबेडकर चळवळीने आंदोलन पुकारले या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा कार्यकर्ता आंदोलनामध्ये सहभागी होता त्यामध्ये पोलिसांनी त्याला उचलून पोलीस कोठडीमध्ये टाकले आणि त्याला बेदम मारहाण केलीया मारहाणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाला या घटनेला आज मी तिला 3 महिने सरकारला काही केल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याच गुड कळेना आणि त्यामध्ये सरकार सोमनाथ हत्या प्रकरण दाबत आहे आणि त्यामुळे संघटनेचे नेते आदरणीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार भजनी आंदोलनाचे आयोजन भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट या ठिकाणी करण्यात आले.
त्यामध्ये बिहार या ठिकाणी महाबोधी महाविहार या ठिकाणी ब्राह्मणांनी कशा पद्धतीने ते बुद्ध विहार काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती स्थापना करून त्या विहाराला एक मंदिराचे स्वरूप आणून हे मंदिर काबीज करण्याचा प्रयत्न बिहार मधले काही आरएसएस व ब्राह्मण लोक करीत आहेत त्याच्या निषेधार्थ गेल्या बऱ्याच वर्षापासून वीहार मुक्तीसाठी आंदोलन केले जात आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व केंद्र सरकार व बिहार सरकार या राज्याला जागे करण्यासाठी आजचा हे भजनी आंदोलन होतं तसेच सोलापूरमध्ये रविवारी मोदी या ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना सुरू असताना प्रार्थना बंद करून तिथल्या महिलांना मारहाण करून व साहित्याची मोडतोड केली व जखमी केले आणि ती प्रार्थना बंद पडली त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची पोलिसांनी दखल न घेता समोरच्या लोकांचे ऐकून त्यांच्याच विरोधामध्ये गुन्हा दाखल केला.
ही बाब निषेधार्थ आहे म्हणून या आंदोलनामध्ये ख्रिश्चन लोकांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकार समितीव समितीचे संयोजक प्राध्यापक शंकर खळसोडे विशेष भाग घेऊन भीम गीताचा व सरकारवर प्रहार करून भजनी आंदोलन घेण्यात आला.
वेळी या कार्यक्रमास भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोधजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम सोलापूर शहराचे अध्यक्ष उमेश सुरते जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुप लोंढे शहराचे अध्यक्ष ज्योतीताई गायकवाड अल्पसंख्याक च्या महिला अध्यक्ष नसरीन अल्पसंख्याक चे जिल्हा अध्यक्ष सलीम भाई मुल्ला मेजर साबळे इब्राहिम शेख समीर मुजावर रफिक शेख मयूर तळ भंडारे विक्रम वाघमारे सुरेश जाधव मुमताज तांबोळी हर्षदीप बनसोडे शिवशरण प्रकाश बनसोडे माया कांबळे राजश्री साबळे मीना गायकवाड रमाबाई लालसरी मुमताज शेख शोभाताई बोबें पठाण सानिया प्रकाश सीताफळे कल्लाप्पा अनिता भालेराव भारत क्षीरसागर आधी पदाधिकारी उपस्थित होते