हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात द बर्निंग ट्रॅव्हल 25 जणांचा कोळसा झाल्यांची माहिती रात्री 1.22 मिनिटाची घटना…समृद्धि घेत आहे बळी

spot_img

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात द बर्निंग ट्रॅव्हल
25 जणांचा कोळसा झाल्यांची माहिती
रात्री 1.22 मिनिटाची घटना…समृद्धि घेत आहे बळी

बुलढाणा सिंदखेड राजा – समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात होवून पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशाचा मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही नागपूर वरुन पुणे जात होती.


तारीख ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुणे साठी निघाली होती.१ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सचे धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्स काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून त्यामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले.ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

Advertisements

काचा फोडून काही प्रवासी बाहेर :-
विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर आहे होते. त्यामध्ये चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.

मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश :- विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे. नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे समृद्धी महामार्गवरती २ वाजताच्या सुमारास अपघात झाला असून सदर बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही.

सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

Advertisements