हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

समाजसेविका सविता बेदरकर यांच्या लेखनीतुन..!

spot_img

समाजसेविका सविता बेदरकर यांच्या लेखनीतुन..!

काल आईच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे एम्स ला जाण्याचा योग आला.
तिथे रेडिओथेरपी विभागाच्या समोर दहाव्या वर्गातला मुलगा भेटला .मी त्याला विचारलं बाळा तू इथे कसा आणि तुला काय झालं ? तो मला म्हणाला ब्लड कॅन्सर आणि मी इथे लाईट घ्यायला आलो…
मी म्हणाले तुझ्यासोबत कोण आहे… छोटा भाऊ आहे ना… म्हटलं बाबा तो म्हणाला ते मजुरीवर गेले आणि आईला बरं नाहीये म्हणून ती घरी आहे.

अगदी सहजच तो बोलून गेला परिस्थिती माणसाला कशी मजबूत बनवते क्षणा क्षणाला मरणाला सामोरे जाणारं त्याच शरीर पण अगदी सहज हसत तो रेडिएशन घेण्यासाठी येतोय.. मृत्यूला हसवतोय..
आज आम्ही आमच्या मुलांना सर्दी ताप जरी झालं तरी आम्ही आमच्या लेकरांना सोडत नाही. तो म्हणाला वडील मजुरीला गेले नाही तर खाणार काय तो परिस्थितीशी झगडत होता आणि त्याचबरोबर त्याचे शरीर सुद्धा कॅन्सरची झगडत होते.

Advertisements

आईला दाखवल्यानंतर माझ्या भावासोबत मी आईला दवाखान्यातून घेऊन आली. तिचं आंघोळ पाणी आटपलं आणि मी परतीची वाट धरली..तोपर्यंत बराच वेळ झाला आणि महाराष्ट्र निघून गेली म्हणून मी बस स्टॉप ची वाट पकडली.. बराच वेळ बससाठी येरझाऱ्या केल्यानंतर अगदी काठी टेकत एक म्हातारा माणूस संडासच्या बाहेर पाय-या उतरताना दिसला .त्याच्याने त्याची काठी सुद्धा पेलवत नव्हती. पांढरे शुभ्र कपडे तसेच नीळ लावलेले. त्यांच्या शरीराकडे पाहताच 80 च्या दरम्यान वय असावं असं वाटलं… पण त्याची काठी सुद्धा एका ठिकाणी टिकत नव्हती थरथरच होती. बाजूला तरुणांचा घोडका जमा होता .कोणताही मुलाहीजा न करता मी धावली आणि त्यांचा हात हातात घेतला दुसऱ्या हातात त्याच्या हातातलं सामान घेतलं पायऱ्याखाली उतरविल्या. आणि विचारलं बाबा कुठे जायचं? तसे ते म्हणाले मला तुकडोजी पुतळ्याकडे जायचं होतं तू कुठे जाणार आहे?

त्यांनी मला लागलीच प्रश्न केला मी म्हणाले नाही मला गोंदियाला जायचं परत.. त्यांचं सामान हातात घेऊन आणि त्यांचा हात हातात घेऊन मी रस्ता क्रॉस करायला बस स्टॉप च्या बाजूच्या बस स्टॉप वर त्यांना नेऊन दिले आणि वापस बससाठी बस स्टॉप वर आली बाजूचा घोडका मी काय विचित्र केले अशा नजरेने माझ्याकडे बघत होता तशी मी जगण्यात कोण काय म्हणेल कधीच परवा करत नाही… कोण काय म्हणेल याची पर्वा करत नाही…

म्हाताऱ्या माणसांना त्यांची मुलं एकटं सोडतातच कशी? आई-वडिलांची इस्टेट मुलांना चालते मग आई-वडिलांचे म्हातारपण मुलांना का चालत नाही..
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण पण या दुसऱ्या बालपणी आई आणायची कुठून?
बहुतेकदा जेव्हा जोडीदार जातो म्हातारपण येते.. मृत्यूची वाट पाहत घरच्यांचा तिरस्कार आणि अवहेलना झेलत.. म्हातारपण काढायचं?
. नेमकं हेच आमची मुलं पाहत असतात परत आमच्या वाट्याला असं जीवन देण्यासाठी आम्ही आमच्या मुलाबाळांच्या समोर काय वाढवून ठेवणार आहोत जे पेराल तेच उगवेल मेल्यावर गाव जेवण देण्यापेक्षा जिवंतपणे त्यांचं करा ते आशीर्वाद देतील …पितर म्हणून कावळ्यांना बोलवतो.. ‌.गावजेवण देण्यापेक्षा जिवंत मायबापाच्या मुखामध्ये दोन घास प्रेमाने घाला त्यांची तृप्ती तुमचं आयुष्य तुमचा आनंद द्विगुणित करण्याचे काम करेल.

Advertisements

मेल्यावर आपण साबणाने आंघोळ करतो त्याला अत्तर स्र्पे लावतो पण दोन शब्द प्रेमाने मुलांनी बोलावं म्हणून त्यांचा जीव डोळ्यात आलेला असतो तर त्यांच्याजवळ जात नाही अशीच प्रतारणा त्यांनी आपल्या लहानपणी आपली केली असती तर …?रात्रभर आईबाप ओल्यावर झोपून पोराच्या वाट्याला कोरडीच चादर देत असतात बाळं शांत झोपावे म्हणून ….बिछाना देत असतात …मांडीवर लेकरू हागलं म्हणून मांडी कापून काढत नाही ना कोणी.. जेव्हा ही म्हातारी माणसं मी घराच्या बाहेर गुडघ्यात मान टेकून बसलेली पाहिली की मला फार अश्वस्थ विचित्र वाटते याच्यासाठीच आपण मुलं जन्माला घालायची का ?

जित्यावर नाही गोडी आणि मेल्या बरोबर वडापुरी करायला?
माणुसकी हरवत चालली काय ?मग मुलं जन्माला घालायची तरी का ?त्यांचे शिक्षणासाठी पैसा खर्च करायचा कशाला आमचं नर्सच करत असेल तर मग संपत्ती जमवायची आणि नर्सला सांगायचं केयर टेकर ठेवायची… मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खायच्या च कशाला?
सध्या श्राद्धाच्या सीजन चालू आहे त्या निमित्ताने सहज सूचलं आणि शब्दात उतरल….साभार फेसबुक सविता बेदरकर

– सविता बेदरकर ,समाजसेविका 

Advertisements