हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू- नारायण बागडे

spot_img

संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू- नारायण बागडे

वर्धा दि.२३ – या देशातील संविधानाला सत्तर वर्ष झाले पंरतू आजपण ७० टक्के लोकांना संविधानाचे महत्व कळले नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते करावे आम्ही तर संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करु  असे मत आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते वर्धा शहरातील सिद्धार्थ नगर मेघे येथिल समाज भवनातील सभागृहात आयोजित भिम सैनिक सन्मान मेळाव्यात कार्यक्रमात बोलत होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी महिला मोर्चा वर्धा शहर अध्यक्षा जया साठे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, अँड सुरेश घाटे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, युवा नेते हंसराज उरकुडे वर्धा जिल्हा अध्यक्षा सुनिता गायकवाड आशिष मोडक अँड दिक्षा मोडक, अनिता रंगारी, शकुंतला गावंडे, भारती डोंगरे सुरेखा झांबरे नंदा बनसोडे प्रतिभा डोंगरे नरेंद्र कांबळे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा झांबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता रंगारी यांनी केले या प्रसंगी बोद्ध उपासक उपासीका यांना धम्म योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने वर्धा जिल्ह्यातील महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisements