हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

शेतकरी कुटूंबातील सोहमचे यश… प्रतिकूल परिस्थितीत जेईईत मिळवले 96 परसेंटाईल मार्क

spot_img

 

शेतकरी कुटूंबातील सोहमचे यश…
प्रतिकूल परिस्थितीत जेईईत मिळवले 96 परसेंटाईल मार्क

नागपुर –  जेईई मेन्स ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे आणि यात यवतमाळ आर्णि येथील श्री. म. द. भारती महाविद्यालयातील सोहम अविनाश राऊत याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जेईई मेन्स मधे 96 परसेंटाईल मार्क प्राप्त केले आहे. सोहम महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहे.

सोहमने आपल्या यशाचे श्रेय महाज्योतीला आणि त्या माध्यमातून शिकवत असलेल्या सर्व प्रशिक्षक वर्गास दिलेले आहे. ज्यांनी नियमित, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जुळून त्यांना समजेल असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारुन वेळोवेळी त्यांच्या शंकेचे निरसन केले.

Advertisements

मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी जेईई पास विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी या योजनेचा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सोहम अविनाश राऊत याचे मनोगत
आईच्या प्रोत्साहनामुळे आणि महाज्योतीच्या प्रशिक्षकांमुळे यश लाभले
आईने दिलेल्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे मी जेईई देऊ शकलो. घरी शेतकर्‍याच्या घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती. मी शाळेत असतांना चांगल्या गुणांनी पास व्हायचो. नवव्या वर्षात असतांना आजारी पडलो आणि सायंसमधे नापास झालो. माझ्या या निकालामुळे माझ्या वडीलांच्या मनावर गंभीर परिणाम झाला आणि त्यांच्या माझ्यावरील शैक्षणिक विश्वास उडाला. मला दहावीमधे चांगला अभ्यास करुन वडीलांचा विश्वास मिळवायचा होता. पण त्याच वेळेस कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. ऑनलाईन अभ्यासासाठी वडीलांनी आर्थिक तंगीत स्मार्टफोन घेऊन दिला. सतत हातात फोन असल्यामुळे मला गेमची लत लागली. आणि त्याचा परिणाम माझ्या दहावीतील निकालावर झाला. तालुक्याला अकरावीत प्रवेश घेतला. इंजिनियर बनण्याचं स्वप्न होतं पण. शैक्षणिक सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी होत्या. त्यावेळी मित्रांकडून जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती मिळाली आणि प्रवेश घेतला. महाज्योतीच्या प्रशिक्षकांनी अभ्यासात गेलली गोडी निर्माण केली. अभ्यासास लावले. टेस्ट सिरीज घेतल्या.

प्रत्येक शंकेचे निरसन केले. जेईई देण्यास वडिलांचा विरोध होता. इंजिनियरींग खर्च झेपणार नाही म्हणाले पण आईच्या पुढाकाराने फॉर्म भरला. परीक्षा दिली. आणि अपेक्षेपेक्षा अधिक चांगला निकाल लागला. आता मी इंजिनियर होणार. महाज्योती बहुजन विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी संस्था आहे.सदर माहिती प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी दिली.

Advertisements