हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

शासकीय योजनांचा गरजू विद्यार्थ्यांनाच फायदा व्हावा: प्रभाकर दुपारे

spot_img

शासकीय योजनांचा गरजू विद्यार्थ्यांनाच फायदा व्हावा: प्रभाकर दुपारे

नागपूर: सहारा मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा भगवान नगर नागपूर येथे शाळेचा 23 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रभाकर दुपारे व्यवस्थापक पत्रकार भवन, सेवानिवृत्त लोकमतचे उपसंपादक, साथ ही समाजसेवी नारायण चिंचोणे माजी नगरसेवक ब संस्था अध्यक्ष मनोज गावंडे संजय नितनवरे, नागसेन लभाने नितेश भोयर सुनील सुटे पंकज चहांदे अविनाश सुटे संस्था की मातोश्री मोना चांदेकर संस्था सचिव मनिष चांदेकर, के जकर्याह, सुनिता जकर्याह, शाळा प्रमूख शोभा केणे सरला राउत यांची उपस्थिती होती, कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचे स्वागत शॉल व रोपटे देऊन स्वागत केले.

आपल्या मार्गदर्शनात प्रभाकर दुपारे यांनी सांगितले की, खरी गरज हि कुणाला आहे ? ज्यांना आहे त्यांना मिळत नसून समाजातील विद्रूप लोक याचा फायदा घेत असून, अशा चांगल्या काम करणाऱ्या शाळांना त्यापासून वंचित ठेवले जाते मग ते वेतन किंवा शाळा चालविण्याकरिता अनुदान असो. पण त्यावर सुद्धा मात करून ही शाळा गेली 22 वर्षे अविरत कार्य करत आहे सहारा मतिमंद मुलांची शाळा ही खरोखरच दिव्यांग मुलांची सेवा करीते व त्यांना समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही शाळा निरंतर करीत आहे या शाळेचे व संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्याजोगे आहे तसेच नारायण चिंचोणे यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात शाळेचे कौतुक करून शाळे करीता आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व भविष्यात या शाळेचे स्वरूप मोठे व्हावे याकरिता मदत करण्याचे आश्वासन देऊन मुलांना गणवेश व खाऊ वाटप केले. कार्यक्रम स्थळी संस्था सचिव मनिष चांदेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले व संचालन लोकेश चोले यांनी केले.

Advertisements