हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

spot_img

शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही!
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

अकोला ब्युरो 3 -9-23  – शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारल्या गेले. या हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना आता जालना येथील घटनेवर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाविजय २०२४ अभियानांतर्गत अकोला लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवार गेली ४० वर्षे सत्तेत असून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे तेच अनेकदा बोललेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला, तो सुप्रीम कोर्टात टिकविला. परंतु, शरद पवारांचे लाडके उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने सरकारची बाजू मांडली नाही. तेव्हा शरद पवार हेच सरकारचे कर्ते-धर्ते होते, असाही टोला त्यांनी लगावला.

Advertisements

प्रकाश आंबेडकरांनी दंगलीची भाषा करू नये
देशात दंगली घडतील या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर उत्तर देताना श्री बावनकुळे म्हणाले, हा देश भगवान तथागत गौतम बुद्धांचा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी दंगलीची भाषा करू नये अशी अपेक्षा आहे. मोदीजींच्या काळात या देशात दंगली घडविण्याची कुणाचिही हिम्मत नाही.

ते असेही म्हणाले
• सर्व पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, परंतु, कॉंग्रेसच्या यात्रेला समर्थन मिळणार नाही.
• बारा बलुतेदार, अठरा पडग जातींसह सर्वानांच मोदीजीच पंतप्रधान हवेत. ५१% हून अधिक मते मिळणार.
• उद्धव ठाकरे यांच्या विमानाचे पायलट संजय राऊत; ते पडणार याची माहिती सर्व कार्यकर्त्यांना आहे
• देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाचे सामाजिक- आर्थिक विश्लेषण केले.
• एकनाथ शिंदे सारखा मर्द मराठा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस व अजित पवार मराठा आरक्षण देणार