हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद नागनाथे यांची निवड ◾️व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची गोंदिया येथे बैठक

spot_img

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद नागनाथे यांची निवड

◾️व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची गोंदिया येथे बैठक

गोंदिया : व्हॉईस ऑफ मॉडिया संघटनेच्या विस्तारासाठी राज्याचे कार्याध्यक्ष मंगेश खाटीक सर यांच्या नेतृत्वात विदर्भाचे अध्यक्ष किशोर कारंजेकर, यांच्या अध्यक्षतेत गोंदिया येथील शासकीय विश्राम गृह येथे आज सकाळी 11 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद नागनाथे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Advertisements

याप्रसंगी व्हाईस ऑफ मिडीयाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश डूडूमवार, संजय राऊत, शाहिद पठाण, रवि सपाटे, संजीव बापट, महेंद्र बिसेन, महेंद्र माने, राधेश्याम भेंडारकर, सतीश पारधी, सुनील कावळे, महेंद्र लिल्लारे, कविता लिचडे, आरिफ पठाण, मायकल मेश्राम, यशवंत शेंडे, राजेश तायवाडे, चंद्रकुमार गणवीर, संतोष रोकडे आदी उपस्थित होते. दरम्यान, संघटनेच्या 21 पत्रकारांनी सदस्य फि भरून नोंदणी केली. यावेळी सर्व सदस्यांना संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटप करण्यात आली.

विशेष म्हणजे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या अथक सहकार्याने ही सभा यशस्वी पणे पार पडली. यावेळी गोंदियाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद नागनाथे यांनी येत्या सोमवारपर्यंत गोंदिया जिल्हा कार्यकरणीसह तालुका कार्यकारिणी गठीत करण्याचे आश्वासन दिले व संघटनेचे विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.प्रमोद नागनाथे WH न्यूज वेब पोर्टल चे पूर्व विदर्भ ब्युरो चीफ असून, निपक्ष,निडर पत्रकार म्हूणन त्यांची ओळख आहे.