वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर “एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड’’ ने सन्मानित
– क्रिटिकल केअरमध्ये नवा मापदंड स्थापित
नागपूर,- मध्य भारतातील अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था असलेले वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरला असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने (एएचपीआय) प्रतिष्ठित अशा “एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड” सन्मानाने गौरवान्वित केले आहे. या पुरस्काराने रुग्णसेवेतील त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेला अधोरेखित केले आहे व नागपूर तसेच महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये उत्कृष्ट क्रिटिकल केअर सेवा प्रदान करणारे आघाडीचे रुग्णालय म्हणून प्रस्थापित केले आहे.
गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला या सन्मानाने अधिक दृढ केले आहे. एएचपीआयकडून मिळालेली ही मान्यता आमच्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा, सुरक्षितता आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाची पोचपावती आहे. हा पुरस्कार केवळ आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेचा बहुमान नसून, दररोज अगणित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ञांच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे, असे वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरचे केंद्र प्रमुख श्री. रवी बागली म्हणाले.
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर हे आरोग्यसेवेच्या मूलभूत उद्दीष्टांपैकी एक आहे. रुग्णालयाने अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, भक्कम पायाभूत सुविधा, तसेच कुशल वैद्यकीय तज्ञांना नेमण्यात सातत्याने गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणे शक्य झाले आहे. प्रगत मॉनिटरिंग प्रणाली, व्हेंटिलेटर्स आणि लाइफ-सपोर्ट मशीन यांनी सज्ज असलेल्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये प्राणघातक आपत्कालीन परिस्थितीत देखील रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळतात.
हा पुरस्कार क्रिटिकल केअरमध्ये सातत्यपूर्ण नवकल्पना आणि उत्कृष्टतेबद्दलच्या आमच्या कटिबध्दतेचा पुरावा आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रत्येक गंभीर रुग्णाला सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी कोणतीही कसूर सोडत नाही. आमचे प्रशिक्षित वैद्यकीय तज्ञ, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन बिकट परिस्थितीत देखील सकारात्मक बदल दाखवून देतात. ही मान्यता आम्हाला अधिक जोमाने कार्य करण्यास आणि क्रिटिकल केअर सेवेत शिखर गाठण्यास प्रेरणादायी आहे,वोक्हार्ट हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉ. चेतन शर्मा म्हणाले.
वोक्हार्ट हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर तज्ञ आणि सल्लागार डॉ. राहुल हीवान्ज यांनी सांगितले,“वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये गंभीर श्वसनविकार, हृदयविकाराच्या आपत्कालीन घटना, संक्रमणाने होणारे विकार, गंभीर अपघाती दुखापती आणि एकापेक्षा अधिक अवयव निकामी होणे यासारख्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचार केले जातात ज्यात रुग्णांना यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवरील उपचाराची एकत्रित गरज असते.
अतिदक्षता विभागातील अनुभवी तज्ञ डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी यांच्या समर्पित सेवेमुळे आमचे हॉस्पिटल क्रिटिकल केयरमद्धे विश्वासार्ह सेवा देणारे ठरले आहे.याशिवाय, यकृत, मूत्रपिंड आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या क्लिष्ट उपचारांमध्ये देखील हॉस्पिटलने उत्कृष्टता प्राप्त केली आहे. आमच्या समन्वित उपचार पद्धतीमुळे रुग्णांना अत्यंत तज्ञ आणि प्रभावी सेवा मिळते, ज्यामुळे यशस्वी उपचार शक्य होतात.”