हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये कॅरोटीडच्या दोन रुग्णावर यशस्वी उपचार

spot_img

वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये कॅरोटीडच्या दोन रुग्णावर यशस्वी उपचार

नागपुर – वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर: वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी आणि नाविन्यपूर्ण परंपरा असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता आहे ज्यामुळे हे हॉस्पिटल मध्य भारतातील रूग्णांसाठी वरदान ठरते. गंभीर रुग्णांना हाताळणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या कॅरोटीड आर्टरीजच्या आणखी दोन केसेसवर यशस्वी उपचार केले.

एका 70 वर्षांच्या पुरुष रुग्णाची एकाहून अधिक वेळा अल्प कालावधीसाठी अचानक चेतना नष्ट झाली होत होती आणि त्यानंतर ते पूर्ण बरे होत होते. ही तक्रार घेऊन ते वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपुरमध्ये आले होते. त्यांच्या एमआर सेरेब्रल आणि नेक अँजिओग्राफीमध्ये डाव्या कॅरोटीड आर्टरीमध्ये गंभीर आकुंचन दिसून आले. त्यांची डाव्या बाजूची कॅरोटीड एंडारटेरेक्टॉमी झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने स्ट्रोकचा कोणताही पुरावा दाखवला नाही आणि अँजिओग्राफीने डाव्या कॅरोटीड आर्टरीमध्ये चांगला प्रवाह दर्शविला.

Advertisements

दुसर्याा एका प्रकरणात 67 वर्षीय पुरुष रुग्णाची २ वेळा डाव्या हाताच्या वरच्या बाजूला अचानक चेतना नष्ट होत होती जी कायम होती परंतु ते आपली दैनंदिन कामे करण्यास सक्षम होते आणि ही तक्रार घेऊन ते वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपुरमध्ये आले होते. एमआरआय नंतर 4 वेसल डीएसएचे मूल्यांकन केले गेले ज्याने बायलॅटरल कॅरोटीड आर्टरीमध्ये गंभीर स्टेनोसिस दर्शविले. लक्षणात्मक बाजू पाहता, राईट कॅरोटीड एंडारटेरेक्टॉमी करण्यात आली. ऑपरेशननंतर, रुग्णाच्या डाव्या बाजूला सौम्य अशक्तपणा होता, ज्यात हळूहळू सुधारणा होत गेली.

डॉ. राहुल झामड यांनी माहिती दिली की, हे दोन वेगवेगळे रुग्ण आहेत, एकाला एका बाजूला स्टेनोसिस आहे आणि दुसऱ्या रुग्णाला दुसऱ्या बाजूला स्टेनोसिस आहे. कॅरोटीड आर्टरी रोगामुळे एक तृतीयांश स्ट्रोक होतात. स्ट्रोक तेव्हा येतो जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मेंदूला जाणारा रक्तप्रवाह रोखते, ज्यामुळे मेंदूला इजा होते.

डॉ. राहुल झामड म्हणाले, “कॅरोटीड एंडारटेरेक्टॉमी ही कॅरोटीड आर्टरी अरुंद होण्यास कारणीभूत फॅटी डिपॉझिट (प्लेक) काढून टाकण्यासाठी एक शस्त्रक्रिया आहे. कॅरोटीड आर्टरी या मुख्य रक्तवाहिन्या आहेत ज्या मान, चेहरा आणि मेंदूला रक्त पुरवतात आणि कॅरोटीड आर्टरी ब्लॉक झाल्यास किंवा रक्ताची गुठळी तयार झाल्यास, एक तुकडा तुटून मेंदूमध्ये जाऊ शकतो ज्यामुळे स्ट्रोक किंवा क्षणिक इस्केमिक अटॅक येऊ शकतो , ज्याला काहीवेळा मिनी स्ट्रोक म्हणून ओळखले जाते (मेंदूच्या काही भागाला रक्तपुरवठ्यात तात्पुरत्या व्यत्ययामुळे होतो) ज्यातून पुनर्प्राप्ती सामान्यतः 24 तासांच्या आत पूर्ण होते.

Advertisements

डॉ. झामड पुढे म्हणाले, या प्रक्रियेमुळे कॅरोटीड आर्टरी गंभीरपणे अरुंद असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी होतो.त्यांनी नमूद केले की कॅरोटीड स्टेनोसिसची लक्षणे अशक्तपणा किंवा चेहरा, हात किंवा पाय सुन्न होणे, बोलण्यात समस्या किंवा एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे असू शकते. लक्षणे दिसू लागल्यानंतर किंवा कॅरोटीड आकुंचन आकस्मिकपणे आढळल्यास ऑपरेशन शक्य तितक्या लवकर केले पाहिजे.

दोन्ही रुग्ण हॉस्पिटल मध्ये बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला .
त्यांनी सांगितले , या प्रक्रियेमध्ये , मानेच्या पुढील भागावर एक चीरा दिल्या जातो आणि रुग्ण पूर्णपणे जागृत असतानाही ही प्रक्रिया केली जाऊ शकते. प्रक्रियेनंतर, डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णाला 2 ते 3 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते. ऑपरेशननंतर अँजिओग्राफी नंतरच्या तारखेला केली जाते. बहुतेक रुग्णांसाठी एंडारटेरेक्टॉमी हा पहिला उपचार असावा. कॅरोटीड स्टेंटिंग हा या प्रक्रियेचा पर्याय आहे आणि तो कमी इन्व्हेसिव्ह आहे, परंतु पेरिप्रोसिजरल स्ट्रोकच्या वाढत्या जोखमीशी संबंधित असू शकतो.

श्री अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड , वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “आम्ही सामान्य माणसाची सेवा करतो तेव्हा आम्हाला आनंद होतो आणि तेही परवडणाऱ्या दरात आणि हे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे वैशिष्ट्य आहे. आमच्या डॉक्टरांचे आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरच्या संपूर्ण टीमचे आभार.”

Advertisements