हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

विधानपरिषद निवेदन : स्वारगेट बस स्थानकावरील महिला सुरक्षेप्रकरणी चौकशी अहवाल सादर;चार अधिकारी निलंबित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

spot_img

विधानपरिषद निवेदन :

स्वारगेट बस स्थानकावरील महिला सुरक्षेप्रकरणी

चौकशी अहवाल सादर;चार अधिकारी निलंबित

Advertisements

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ११ : स्वारगेट बस स्थानकावर १६ फेब्रुवारी रोजी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहेअसे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याने स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुख यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीच्या अहवालानुसारएसटी महामंडळाने बस स्थानकावर कार्यरत असलेल्या २२ सुरक्षारक्षकांना तातडीने बदली करण्याचा निर्णय घेतला. तसेचप्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा मंडळाला देण्यात आल्या आहेत.

Advertisements

या प्रकरणात हलगर्जीपणा आढळल्याने वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री. जयेश पाटीलकनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटीलसहायक वाहतूक निरीक्षक श्री. सुनील येळेतसेच सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 यापुढे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेलअसेही निवेदन परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी केले