विद्युत करंट लागून बाप-लेकाचा मृत्यू
◼️अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील घटना
◼️आरोपीवर गुन्हा नोंद करून अटक
गोंदिया : शेतामध्ये जनावरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सुरु असताना संपर्कात आल्याने विद्युत करंट लागल्याने बापलेकाचा मृत्यु झाल्याची घटना अर्जुनी मोर. तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात 21 मार्चच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. वामण दुधराम हातझाडे (वय 50 वर्षे) व मुलगा संतोष वामण हातझाडे (वय 24) असे दुर्दैवी बापलेकाचे नाव आहे. दरम्यान, विद्युत प्रवाह सोडणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामधील आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते वय (47 रा. मोरगाव) यांने आपल्या मकापिकाच्या शेताभोवती लावलेल्या कुंपन तारामधुन विद्युत करंट सोडल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यु होण्याच्या संभव असण्याची जाणीव असताना आरोपी ने स्वतःचे राहते घरातुन विद्युत केबल टाकून कुंपनाचे तारेला विद्युत करंट लावला. त्यामुळे त्या तारेला चिपकल्याने सदर दोन्ही मृतक मरण पावले. आरोपीचे शेत मृतकाचे घराचे मागे असल्याने मृतक वामण दुधराम हातझाडे हा त्या शेताजवळुन रात्री 10 वाजता जात असताना विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला.
तर आपले वडील आले नाही म्हणुन मुलगा संतोष हा मागोमाग गेला वडील पडले असावे म्हणुन त्यांना उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विद्युत करंट लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यु झाला. हि घटना मृतकाचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने सावधगीरी बाळगुन शेतमालकाला माहिती दिल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी दशरथ दुधराम हातझाडे यांचे तक्रारीवरुन अर्जुनी मोर. पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली. व पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्जुनी मोर.पोलीसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांचे वर अपराध क्रं. 112 भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे मार्गदर्नाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, बिट अंमलदार रोशन गोंडाणे, महेंद्र पुण्यप्रेड्डीवार करीत आहेत.