हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून स्वतःला घडविले पाहिजे ◼️माजी मंत्री बडोले यांचे प्रतिपादन ◼️सडक अर्जुनीत नवोदय प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार

spot_img

विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून स्वतःला घडविले पाहिजे

◼️माजी मंत्री बडोले यांचे प्रतिपादन

◼️सडक अर्जुनीत नवोदय प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार

Advertisements

गोंदिया : जीवनात शिक्षण हेच सर्वस्व आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून, शिस्त लावून स्वतःला घडवलं पाहिजे आणि उच्च शिक्षण घेतल पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज आहे व शिक्षकांनीही त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केले.


जवाहर नवोदय विद्यालयात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने आज, (दि. १९ ) राजकुमार बडोले यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी हे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत. दरम्यान, माजीमंत्री इंजि.राजकुमार बडोले फाऊंडेशन तर्फे या विद्यार्थ्यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने जिप सदस्य कविता रंगारी, निशा तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदा बडोले, पं.स. उपसभापती शालिंदर कापगते, अर्जुनी/मोर
पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, पं. स. सदस्य चेतन वडगाये, वर्षा शहारे, माजी सभापती गिरीधर हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कोहमाराच्या संरपच प्रतिभा भेंडारकर, रंजना भोई, वराठे, बोरकर, मेश्राम, राजेश कडूकर, सुरेश अमले, सुधीर वाहने, राऊत, राजकुमार बडोले फाउंडेशन चे प्रशांत शहारे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शालिंदर कापगते यांनी व आभार प्रदर्शन चेतन वडगाये यांनी केले.
०००००००००००