वाढत्या अतिक्रमणावर नप चा चालला बुलडोजर..!
वाडी नगर परिषदची धड़क कार्यवाही
नागपुर – वाड़ी नगर परिषद क्षेत्रात वाढत्या अतिक्रमणावर गुरुवारी नगर परिषद ने बुलडोजर चालवून सफाया केला.नागपुर अमरावती महामार्ग लगत असलेल्या काटोल बायपास व खडगाव मार्गावरील अतिक्रमण वाढले होते ते काढल्या गेले.
रस्त्यालगत असलेल्या रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असुन उड्डान पुलाच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत दोन्ही बाजूने वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहे. त्या अतिक्रमण धारक दुकानावर वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार व वाहतुक विभाग एम.आय.डी.सी झोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांच्या बंदोबस्तात अतिक्रमणाचा जेसीबीच्या साहाय्याने गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सफाया करणे सुरू केले आहे.
अतिक्रमणात महामार्ग लगत असलेले सर्व पानठेले ,नास्ता चहाचे दुकान, मांसविक्रीचे दुकान ,चिकन सेंटर , फळाचे दुकान आदीवर जेसीबीच्या साहाय्याने हातोडा चालविला. या अगोदर सुद्धा २२ जानेवारी २०२२ व २४ ऑगस्ट २०२२ रोजी दुकानदारांना नोटीस देवून अतिक्रमण कार्यवाही केली होती. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर पून्हा रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी उपमुख्याधिकारी गौरव गाडगे, उपमुख्याधिकारी रत्नमाला फिटिंग,अधिकारी सुरज बाळेकर, योगेश जहागीरदार,नंदन गेडाम, सतीश जाधव,अमोल सोनसरे, मनोहर वानखेडे, धनंजय गोतमारे, भारत ढोके, अशोक जाधव , प्राची लांजेवार, पल्लवी हुमणे, सुषमा भालेकर, माधवी भिलावेकर, अतुल सदार ,सरिता गजभिये,भीमराव जासुतकर,रमेश कोकाटे, कमलेश तिजारे,आनंद भगत,अशोक जाधव, अंकीता, रंदे, वर्षा रंदे ,अश्विनी ठाकरे आदीसह सफाई कर्मचारी पुरुष व महीलांनी सहकार्य केले. तसेच अतिक्रमण शांततेत पार पाडण्याकरिता वाडी पोलिस स्टेशन चे पियसआई अविनाश निकाळजे,डब्लुपीएसआई कोळी,एएसआय नवलकिशोर इंगळे, हेड कॉन्सटेबल दिनेश तांदूळकर, गोविंद मांडवगडे, गणेश आगरेकर, राजेंद्र बोराटे, तुरकेश, मारोती बंदोबस्तात हजर होते.
अतिक्रमण सहन करणार नाही
वाडी शहरातील अवैध अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्यानंतरही वारंवार त्यांना माहिती देण्यात आली.आता अतिक्रमण हटवण्यात आले.त्यानंतर जर कोणी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल.वाडी शहरातील अवैध अतिक्रमण सहन करणार नाही.
डॉ.विजय देशमुख
मुख्याधिकारी नगर परिषद वाडी