वाड़ीत् योग दिवस साजरा,भाजपा शहर यांनी केले आयोजन
नागपुर – संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना भारतीय जनता पक्ष वाडी शहराकडून मा.आमदार समीर मेघे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील महर्षि शाहू महाराज प्ले ग्राउंड वर योग दिन साजरा करण्यात आला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांसोबतच परिसरातील नागरिकांनी यावेळी योगासने केले आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या कुटुंबकम करिता योग ही संकल्पनेनुसार योग शिक्षिका सौ नेहा देशमुख व सौ नाईकवाडे ताई यांनी योगासनाचा सराव करून घेतला.
आयुष्यात योगासनाचे महत्त्व किती असते हे समजावून सांगितले शिबिराच्या यशस्वीते करिता वाडी शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्याने तथा महीला आघाडीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले यावेळी प्रामुख्याने श्री सतीशजी जिंदल, श्री पुरुषोत्तम रागीट, श्री नरेश चरडे,श्री आनंद बाबू कदम ,भाजपा वाडी शहर अध्यक्ष श्री केशव बांदरे ,श्री मानसिंग जी ,श्री चंद्रशेखर देशभ्रतार युवा मोर्चा वाडी मंडळ अध्यक्ष ईशांत राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय तिडके अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष योगेश शेंडे नागपूर जिल्हा महिला आघाडी महामंत्री भोले ताई सौ कल्पनाताई सगदेव, सौ सुरेखा रिनके, उमेश शाहू विनोद सदार सौ भोरकर सौ दिया डांगे, सौ माधुरी थेटे, सौ लता पाटील, सौ लक्ष्मी बैसे राहुल तायडे, जयंत वैद्य उपास्थित होते