वन विभागाने केला जागतिक वन दिवस साजरा..
-वनमंत्री सुधीरभाऊ मूँगनटिवार यांनी दिला ऑनलाइन शुभेच्छा सन्देश
नागपुर WH न्यूज़ -जागतिक वन दिवस 21 मार्च ला आंतरराष्ट्रीय वन दिवस निमीत्त्य यूनायटेड नेशन्स ने सन 2023 करीता दिलेल्या थिम ( वने आणि आरोग्य ) या विषयाच्या अनुषंगाने नागपूर वनवृत्त अंतर्गत हरिसिंग सभागृह , सेमिनरी हिल्स , नागपूर येथे आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला .
उक्त कार्यक्रमास प्रदिप कुमार , प्रधान मुख्य वनसंरक्षक ( अर्थसंकल्प , नियोजन व विकास ) महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणून लाभले . शैलेश टेंभुर्णीकर , प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ( महा कॅम्पा ) महाराष्ट्र राज्य आणि श्री . पी . कल्याणकुमार , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( माहिती तंत्रज्ञान व धोरण ) महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
तसेच , नागपूर वनविभागातील सर्व सहाय्यक वनसंरक्षक , वनपरिक्षेत्र अधिकारी व नागपूर वनवृत्त कार्यालय आणि विभागीय कार्यालयातील कर्मचारी तसेच नागपूर जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक उपस्थित होते . • सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी व्दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमास सुरुवात केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . रमेश कुमार , मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) , नागपूर यांनी सादर केले . तद्नंतर मा . ना . सुधीरभाऊ मुनगंटीवार , मा . मंत्री ( वने , सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय ) महाराष्ट्र राज्य यांनी आंतरराष्ट्रीय वन दिवस निमीत्त्य शुभेच्छा संदेश प्रसारीत करण्यात आला .
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दशकातील वनक्षेत्रातील बदल या विषयावर श्री . भुमिदास नाईक , सहाय्यक संचालक , भारतीय वन सव्र्हेक्षण , मध्य अंचल , नागपूर यांनी सादरीकरण केले . त्यानंतर डॉ . प्राजक्ता गद्देवार , सहयोगी प्राध्यापक , शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यांचे वने आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले . उक्त कार्यक्रमात 1 ) मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुल , नागपूर , २ ) नागपूर माध्यमिक विद्यालय , नागपूर , ३ ) भिडे गर्ल्स हायस्कुल , नागपूर , ४ ) कोलबास्वामी विद्यालय , धापेवाडा , कळमेश्वर व ५ ) राष्ट्रीय आदर्श विद्यालय , नवेगांव खैरी , पारशिवनी या शाळेच्या विध्यार्थी व शिक्षक वृंदानी वनासंबंधी जागरुकता अभियानात व उपक्रमात उत्स्फुत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले . याप्रसंगी बोलताना शैलेेेश टेंभुर्णीकर , प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ( महा – कॅम्पा ) महाराष्ट्र राज्य यांनी मानवी आरोग्यातील वनांचे महत्व आपल्या व्याख्यानात विशद केले . तसेच , श्री . पी . कल्याणकुमार , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( माहिती तंत्रज्ञान व धोरण ) महाराष्ट्र राज्य यांनी आपले प्रबोधनात राष्ट्रीय वननितीचे विश्लेषण करताना वन संरक्षण होण्याची गरज पटवून दिली . यानंतर मा . अध्यक्ष प्रदिप कुमार , प्रधान मुख्य वनसंरक्षक ( अर्थसंकल्प , नियोजन व विकास ) महाराष्ट्र राज्य यांनी आपले संबोधनात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना विस्तृतपणे मांडताना वनक्षेत्रात वाढ होणे ही काळची गरज असल्याचे मत व्यक्त केले .
गीता नन्नावरे , विभागीय वन अधिकारी , सामाजिक वनीकरण विभाग , नागपूर यांनी कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार मानले . उक्त कार्यक्रमाचे सफल नियोजन श्री . रमेश कुमार , मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) , नागपूर , डॉ . भारत सिंग हाड़ा , उपवनसंरक्षक , नागपूर वनविभाग , नागपूर , सौ . गीता नन्नावरे , विभागीय वन अधिकारी , सामाजिक वनीकरण विभाग , नागपूर यांचे मार्गदर्शनात श्री.सुरेंद्र काळे , सहाय्यक वनसंरक्षक ( तेंदू व कॅम्पा ) , नागपूर , सौ . सारीका वैरागडे , वनपरिक्षेत्र अधिकारी , सेमिनरी हिल्स , नागपूर , श्री . अविनाश लोंढे , मानद वन्यजीव रक्षक व श्री . कुंदन हाते , माजी सदस्य , महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ आणि सेमिनरी हिल्स , नागपूर वनपरिक्षेत्राचे सर्व कर्मचारी यांनी केले .