वनविभागाने राबविली प्लास्टिक निर्मूलन,कचरा सफाई अभियान
नागपुर – वनविभाग ( प्रादेशिक ) तर्फे जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्व संध्या ला प्लास्टिक निर्मूलन तथा कचरा सफाई अभियान सेमीनरि हिल्स बालोद्यान ते जापानी गार्डन येथे साजरा करण्यात आला . याप्रसंगी नुकतेच रुजू झालेले सहाय्यक वनसंरक्षक श्री अतुल देवकर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले तसेच निसर्गातील बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठीचे उपाय योजना तसेच सामान्य जनतेचा सहभाग किती महत्त्वाचं आहे हे विषद केले .
याप्रसंगी बर्ड्स ऑफ विदर्भ , दी हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी तसेच जे सी आई चा प्रतिभा महिला सेल तसेच नागपूर वनविभाग सेमिनरि हिल्स आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर चे सर्व कर्मचारी उपस्थित होते . हा उपक्रम उपवनसंरक्षक श्री भारत सिंह हाडा ( भा.व. से . ) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे , अविनाश लोंढे ( मानद वन्यजीव रक्षक ) तसेच कुंदन हाते यांच्या द्वारे राबविण्यात आला . ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर च्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके , आणि इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .