वंचित बहुजन आघाडी धावली जनतेच्या पाण्यासाठी
आशीनगर झोन नागपुर- अचानक शहरातील काही भागात पाणी पुरवठा बन्द झाल्याने लोकांची पाण्यासाठी धावपळ झाली. मात्र वंचित बहुजन आघाडी ने पान्यासाठी धाव घेत लोकांना पाणी दिले.
प्रभाग क्रमांक 6 सिद्धार्थ नगर टेका विभात पाणी पुरवठा स्थगित झाल्या मुळे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली. सिद्धार्थ नगरातील नागरिकांनी विभागीय महासचिव सुमित चव्हाण यांच्या कडे तक्रार केली सुमित चव्हाण यांनी विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटिल यांची साथ घेऊन OCW च्या कार्यालयात पाण्याच्या टँकरची मागणी केली, व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते यश नागभीडे, अखिलेश डोंगरे, शांतनू नागभीडे व इतरांना सोबत घेऊन बैझनबाग पाण्याच्या टाकी ला जाऊन टँकर चीं व्येवस्था केली.
प्रभागा 6 मधील नागरिकांना पाण्याची व्येवस्था करून दिली त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात हे ठसले कि वंचित बहुजन आघाडी नेहमी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे उभी आहे.