हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

रेल्वेगाडीच्या धडकेत गणखैराचे सरपंच ठार ◾️गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील घटना

spot_img

रेल्वेगाडीच्या धडकेत गणखैराचे सरपंच ठार

◾️गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील घटना

गोंदिया, : गोरेगाव तालुक्यातील गणखैरा येथील सरपंच संतोष आदमने हे शेतीची कामे करून घरी परत जात असताना रेल्वेगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, (ता. 2) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर गणखैरा गावशिवारात घडली.

Advertisements


संतोष आदमाने यांची गावालगत शेती असून शेतात खरीप हंगामातील भात रोवणीची कामे सुरू असल्याने ते शेताकडे गेले होते. दरम्यान, त्यांच्या शेताजवळूनच गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेमार्ग असून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते रेल्वेरुळ ओलांडत असताना चंद्रपूरकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने त्यांना चिरडत नेले. ज्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. सरपंच संतोष आदमाने यांच्या अपघाती मृत्यूमुळे गणखैरा गावात शोककळा पसरली आहे.
०००००००००००