राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गडचिरोलीवरून आगमन..
कोराडी येथील सांस्कृतिक भवन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार
नागपूर, दि. ५ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे दुपारी १ वाजता गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत कार्यक्रमावरून नागपूरला परतल्या. दुपारच्या विश्रांतीनंतर राष्ट्रपती कोराडी येथील सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण करणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते.
दुपारी ५ वाजता भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.