हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

राज्यातील ४५.३४ लाख लोकांना अँटी फायलेरियल औषध ◼️गोंदियासह ५ जिल्ह्यात मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कार्यक्रम

spot_img

राज्यातील ४५.३४ लाख लोकांना अँटी फायलेरियल औषध

◼️गोंदियासह ५ जिल्ह्यात मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कार्यक्रम

गोंदिया : लिम्फॅटिक फायलेरियासिस निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड या ५ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे देण्याचा (मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन -एमडीए) कार्यक्रम २६ मार्च पासून सुरू होत आहे. दरम्यान, या कार्यक्रमातंर्गत या पाचही जिल्ह्यातील ४५ लाख ३४ हजार ६५३ नागरिकांना औषध वाटप करण्यात येणार आहे. याविषयी जनजागृती व्हावी. यासाठी नुकतीच आरोग्य सेवा संचालनालय आणि ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजीज ऑर्गनायझेशन तर्फे एका व्हर्च्युअल मीडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते.

Advertisements

फायलेरिया पासून बचावासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड या ५ जिल्ह्यांमध्ये एकूण ४५ लाख ३४ हजार ६५३ लोकांना अँटी-फायलेरियल औषधे देण्यात येणार आहे. ज्यामध्ये गोंदिया – ८ लाख ९६ हजार १५७ लोकांना ही औषध देण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील ११ लाख ६१ हजार ४०४, भंडारा २ लाख ७२ हजार ८३३, नांदेड १९ लाख ४८ हजार ६१२ आणि गडचिरोली २ लाख ५५ हजार ६४७ लोकांना फायलेरियल औषधे देण्यात येणार आहे. यानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी माध्यम प्रतिनिधींकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक तसेच फायलेरिया निर्मूलन राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी फायलेरियासिसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी २६ मार्चपासून राज्यातील निवडक पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे देण्याचा कार्यक्रम सुरू होणार असल्याचे सांगून या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे तिहेरी औषधांचा अवलंब करतील. यात डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन (DEC, Albendazole आणि Ivermectin) ही तीन औषधे देण्यात येतील. गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यात डीईसी आणि अल्बेंडाझोल ही दोन औषधे देण्यात येतील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

◼️कसा होतो आजार…
फायलेरिया हा एक गंभीर आजार असून कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना संक्रमित डास चावल्यामुळे तो होतो. यामध्ये लिम्फॅटिक सिस्टमला हानी पोहोचते. याला प्रतिबंध न केल्यास, शरीराच्या अवयवांमध्ये अत्यंत सूज येते.

Advertisements

◼️१० देश निर्मूलनाच्या उंबरठ्यावर
जगभरातील १९ देशांमध्ये फायलेरियासिसचे निर्मूलन झाले असून १० देश निर्मूलनाच्या अगदी जवळ आहेत. समाजातील सर्व सदस्यांनी ही औषधे वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास, फायलेरियासिस दूर करणे शक्य आहे.

◼️कोणतेच दुष्परिणाम नाही…
फायलेरियासिस प्रतिबंधक औषधे घेतल्याने सामान्य व्यक्तींवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र जर एखाद्याला औषध घेतल्यानंतर उलट्या, चक्कर येणे, खाज सुटणे किंवा मळमळ यांसारखी लक्षणे जाणवली तर त्यांच्या शरीरात मायक्रो-फायलेरिया असल्याचे ते लक्षण असते. ते या औषधांच्या सेवनाने नष्ट होते.
डॉ. एस.डी. निमगडे, सहाय्यक संचालक (मलेरिया) आरोग्य सेवा संचालनालय, नागपूर