राजेंद्र बडोले यांना आचार्य पदवी बहाल
सालेकसा : येथील सामाजिक कार्यकर्ता व भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राजेंद्र हरिदास बडोले सालेकसा यांना कलिंगा विद्यापीठ रायपूरच्या वतीने आचार्य पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे.
राजेंद्र बडोले यांनी २०१९ या शैक्षणिक सत्रात पीएचडी अभ्यासक्रमाकरिता नोंदणी केले होते. २०१९ ते २०२४ या कालखंडात आपला शोध प्रबंध अभ्यासक्रम पूर्ण केला. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील व्हालीबाल खेडाळू मधील व्हेरीएबल्सची तुलना, शारीरिक किंवा फिजिओलाजिकल फिटनेस, एंथ्रोपोमेट्री, मानव शरीर भौतिक मानवविज्ञान या विषयावर डॉ. अतुल शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी रिसर्च केला आहे. पीएचडी करण्याकरिता त्यांना त्यांच्या सौभाग्यवती शालिनी राजेंद्र बडोले यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. राजेंद्र बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यातीलआदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार उत्तम व उच्चशिक्षणासाठी शाळा महाविद्यालय सुरु करून शिक्षणाचे प्रचार प्रसार करीत आहेत.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, पत्नी शालिनी बडोले, नातेवाईक व मित्र परिवारांना दिले आहे. यशाबद्दल खेमराज साखरे, राकेश रोकडे, हुसेन चौधरी, प्रशांत लोथे, भूषण राऊत, निर्दोष साखरे, भिवराम भाष्कर, अनिल तिरपुडे, युवराज लोणारे, राजेश भाष्कर, विजय जाभुडकर, रमेश करवाडे, विजय मानकर, गणेश भदाडे, व तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी अभिनंदन केले आहे.