हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

येळमागोदी येथे सर्प दंशाने मायलेकींचा मृत्यू

spot_img

येळमागोदी येथे सर्प दंशाने मायलेकींचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील येळमागोदी येथे झोपेत असलेल्या मायलेकींना विषारी सापाने दंश केल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. कमळाबाई सुखीराम उसेंडी (३०) रा.येळमागोदी, मंजु सुखीराम उसेंडी (०६) रा.येळमागोदी असे मृत मायलेकींची नावे आहेत.

कमळाबाई व तिची सहा वर्षिय चिमुकली मंजु हे दोघे जवळ-जवळ झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री २ वाजता सुमारास विषारी सापाने दोघीना दंश केला. यावेळी कुटूबीयांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, कमळाबाईची प्रकृती गंभीर असल्याने तिला लगेच गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर मंजुवर चिचगडच्या ग्रामीण रूग्णालयातच उपचार सुरू करण्यात आले. परंतू , उपचारदरम्यान दोन्ही मायलेकींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड परिसरासह येळमागोदी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
…………

Advertisements