उपमुख्यमंत्री फडणवीस बनले,मुख्यमंत्री शिंदेचे चालक..! मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी समृद्धि महामार्गाची केले पाहणी…
नागपुर – WH न्यूज़
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले.
विमानतळावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेले.फडनवीस यांनी तर चक्क स्वता गाड़ी चालवून महामार्गाचा आनंद घेतला.म्हणाले की आता मराठवाड़ा व विदर्भाचा विकास होणार.समृद्धि महामार्ग बघण्यासाठी मोठा फौज फाटा होता.
फडणवीस बनले शिंदे चे चालक,कार्यकर्त्यात नाराजी
समृद्धि महामार्गाची पाहणी करण्या करिता आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चालक इतर कोणी नाही तर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले.राज्यात नव्हे तर केंद्रात एक मोठा राजकारी म्हणून फडणवीस यांचे नाव आहे.मात्र सध्या राज्यात त्यांच्यावर शिंदे यांची गाड़ी चालवण्याची वेळे येने म्हणजेच पुढील राजकारणात फडणवीस यांचे कद क़ाय असेल या चित्रावरुन दिसून येते आहे.राजमार्गाचा आनंद घ्यायचाच आहे तर फडणवीस यांनी आपली स्वाताची गाड़ी करुण चालवायला पाहिजे होती.शिंदे यांचे चालक बनल्याने राज्यात कार्यकर्त्या मध्ये नाराजगी आहे.