हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मीडिया कॅरम स्पर्धेत ,कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

spot_img

मीडिया कॅरम स्पर्धेत ,कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

नागपूर, ता. ६ : पत्रकार क्लब आॅफ नागपूर आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर (एसजेएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मीडिया कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतने पुरुष एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले.

सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लबमध्ये रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कुणालने विजय ठाकूरला २५-६, २५-७ ने पराभूत केले. नसीम शेखने संदीप गाडगेला २५-० ने नमवून तिसरे स्थान प्राप्त केले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कुणाल व विनोद सूर्यवंशी या जोडीने भिमराव लोणारे व सुभाष शर्मा या जोडीला २५-६ ने पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतील विजय ठाकूर व गिरीश ठाकरे या जोडीने परितोष प्रामाणिक व नसीम शेखला २३-११ ने पराभूत केले.

Advertisements

पत्रकार क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, सचिव परितोष प्रामाणिक, कोषाध्यक्ष नीलेश देशपांडे व स्पर्धेचे संयोजक चारुदत्त कहू उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन नरेश शेळके यांनी केले.