हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मालकी हक्क असलेल्या प्लाटवर मेश्राम यांनी केले अवैध बांधकाम ◾️प्रमोद कोसरकर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहीती

spot_img

मालकी हक्क असलेल्या प्लाटवर मेश्राम यांनी केले अवैध बांधकाम

◾️प्रमोद कोसरकर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहीती

गोंदिया : गोरेगाव येथील भाजीपाला आठवडी बाजार परिसरात गट क्रमांक ११३८/१ चे दोन आर जमिनीत २ हजार स्क्वेअर फुटाचे मालकी हक्काचे प्रमोद कोसरकर नावाने प्लाट आहे. या प्लाटवर शामु तुकाराम मेश्राम रा. गोरेगाव यांनी अवैध कब्जा करीत नगरपंचायतची विना परवानगी अवैध बांधकाम करीत असून हे अवैध बांधकाम थांबविण्यात यावे, व मला न्याय देण्यात यावा अशी मागणी नगरपंचायत गोरेगाव व पोलीस स्टेशन गोरेगाव येथे केल्याची माहीती प्रमोद कोसरकर यांनी शुक्रवारी (ता०६) जैन रिसार्ट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

प्रमोद कोसरकर रा.छोटा गोंदिया येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, १७ मार्च २०२० ला दिनेश फरकुंडे रा गोविंदपुर गोंदिया यांच्याकडून दोन लाख ९० हजार रुपयात आठवडी बाजार परिसरात २ हजार स्क्वेअर फूट असलेले प्लाट विकत घेऊन अधिकृत विक्रीनामा लिहुन घेतले व शासकीय फी भरून तलाठी रेकॉर्ड वर फेरफार केले आहे. मी छोटा गोंदिया येथे राहत असल्याने गोरेगाव येथे जास्त ये-जा केली नाही.प्लाट मोकाट असल्याचा फायदा शामु मेश्राम यांनी घेत अवैध बांधकाम सुरु केल्याची माहीती मिळाली. प्लॉटवर येवून पाहणी केली असता बांधकाम होताना दिसून आले. या संदर्भात ता. ९ नोव्हेबर गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच नगरपंचायत गोरेगाव येथे चौकशी केली असता बांधकामाची परवानगी घेतले नसल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनी दिली. अशी माहिती प्रमोद कोसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

◾️बांधकाम थांबविण्याचे नोटीस….

शामु मेश्राम हा जमिनीचा मालक नसून भोगवटदार आहे. त्यांनी सुरू केलेले बांधकाम अवैध आहे. तात्काळ बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisements

– गायत्री तिडके, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत गोरेगाव
———————————