हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

माजी आमदार बनसोड यांच्याघरी ४.४७ लाखाची चोरी ◼️एकांतवास पाहून साधला डाव

spot_img

माजी आमदार बनसोड यांच्याघरी ४.४७ लाखाची चोरी

◼️एकांतवास पाहून साधला डाव

गोंदिया : संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणूकीचे रणसंग्राम सुरू असून निवडणूकीच्या प्रचारात असलेले तिरोडाचे माजी आमदार तथा अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्या तिरोडा येथील शहीद मिश्रा वार्डातील घरातून अज्ञात चोरट्यांनी ४.४७ लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना गुरुवार, (ता. ७) रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बनसोड यांचे चालक सोमप्रकाश बिसेन (वय ४२ रा. मेंढा, ता. तिरोडा) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Advertisements

माजी आमदार बनसोड हे जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. तर सद्यस्थितीत ते अर्जुनी-मोरगाव येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, तिरोडा येथील शहिद मिश्रा वार्डातील घरी कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याची गोप, सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याच्या बांगळ्या, सोन्याची नथनी, कानातील सोन्याचे रिंग, २ नग सोन्याचे मिनी मंगळसुत्र व नगदी १ लाख ५० हजार असा एकुण ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित वानखेडे करीत आहेत.
००००००००