हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

महिलाच आणू शकतात जागतिक स्तरावर हातमागला ‘अच्छे दिन’ : कांचन गडकरी

spot_img

महिलाच आणू शकतात जागतिक स्तरावर हातमागला ‘अच्छे दिन’ : कांचन गडकरी

– राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त उत्कृष्ट विणकरांचा सत्कार

– गोंड कला डाक लिफाफ्यांचे कांचन गडकरी यांच्या हस्ते विमोचन

Advertisements

नागपूर : वस्त्रोद्योग व्यवसाय राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील लाखो विणकरांच्या कुटुंबाचे भरणपोषण या हातमागच्या भरवशावर होत आहे. काही दशकांपूर्वी घरोघरी आणि गावोगावी मांगठ्यांवर विणकाम चालायचे. आता याचे प्रमाण कमी झाले असले तरी हातमाग व्यवसाय संपूर्ण राज्यात पसरलेला आहे. परंतु हातमाग उत्पादन जागतिक पातळीवर नेण्यासाठी योग्य मार्केटिंगची गरज आहे. महिलाच हातमाग व्यवसायाला जागतिक स्तरावर ‘अच्छे दिन’ आणू शकतात असा विश्वास संस्कार भारतीच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी व्यक्त केला.

पुढे श्रीमती गडकरी म्हणाल्या, नागपूर विभागातील हातमाग क्षेत्राला पारंपरिक वारसा लाभलेला असून तो पूढे नेण्याचे काम महामंडळ करीत आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. याकरिता प्रत्येकाने हातमाग वस्त्र खरेदी करावे; यामुळे ग्रामीण भागातील विणकरांना रोजगार मिळण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे हातमाग व्यवसायाला चालना मिळेल. त्याकरिता प्रचार व प्रसिद्धीची जास्त गरज असल्याचेही कांचन गडकरी यावेळी म्हणाल्या.

राज्य हातमाग महामंडळाच्यावतीने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महामंडळाचे मुख्य कार्यालय, निर्मल नगरीजवळ, उमरेड रोड नागपूर येथे उत्कृष्ट विणकरांचा सत्कार कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कांचन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. दरम्यान गडकरी यांनी विणकर बांधवांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisements

कार्यक्रमात प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या काचनताई गडकरी, पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, सहआयुक्त (वस्त्रोद्योग) प्रसाद म. राज्य हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सीमा पांडे, सहव्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, महामंडळाच्या डिझायनर निधी गांधी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रेशीम संचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सत्कार केलेले विणकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय निमजे यांनी केली. तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सीमा पांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करून “राष्ट्रीय हातमाग दिवस” साजरा करत असतांना हातमागाचे महत्त्व पटवून सांगितले. व परंपरागत कूटीर उद्योग असलेल्या हातमाग स्वदेशी व्यवसायाला बळकट करण्याचे आवाहन केले.

आभार प्रदर्शन महामंडळाच्या डिझायनर निधी गांधी यांनी केले. “राष्ट्रीय हातमाग दिवस” निमित्त एल.ए.डी. आणि श्रीमती आर.पी. महिला कॉलेज, नागपूर येथील विद्यार्थ्यांद्वारे हातमागावर उत्पादित वस्त्रांचा फॅशन शो करण्यात आला. संचालन डॉ. वर्षा ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
——-

Advertisements