हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे केली शिव जयंती साजरी 

spot_img

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे केली शिव जयंती साजरी 

नागपुर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडी तसेच श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती तर्फे काटोल बाय पास रोड चौक वाडी येथे शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची कमी सैन्यात जिंकणारी युद्धनीती जगाने पाहली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.श्री.छत्रपती शिवाजी महाराजाची सुंदर मूर्तीचे पुजन व आरती मनसेचे जिल्हा अध्यक्ष मा.आदीत्यदादा दुरुगकर यांचे शुभ हस्ते करण्यात आली हजारोच्या संखेत नागरिक व महिला उपस्थित होत्या
श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवसानिमित्त केक कापून जन्मदिवस साजरा केला यानिमित्ताने गोड मिठाई,चवदार भोजन वाटण्यात आले.

Advertisements

मनसेचे जिल्हा अध्यक्ष मा.आदीत्यदादा दुरुगकर यांनी मार्गदर्शनात सांगीतले जादुई पराक्रम व युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजाच्या युद्धनीतीमध्ये होती १८ पगड जातीच्या माणसांवर प्रेम करुन त्यांना युद्धामध्ये कमी सैन्य असूनसुद्धा जिंकण्याची किमया शिकवली त्यांना युद्ध नीती शिकवून युद्धात लढण्याची संधी दिली व अनेक लढाया जिंकल्या असा जाणता राजा पुन्हा जन्माला येणार नाही त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही
म्हणून श्री.छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा जोतिबा फुले घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर असलेले उपकार आपण विसरू नये व त्यांचे विचार जिवंत ठेवावे. गावातील नागरीक तसेच मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून,जगमग लायटीगं लाऊन,अतीशय सुदंर अशी सजावट करुन वाजत गाजत शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मनसे पदाधिकारी तसेच सतिश सहारे,भरत सहारे यांनी मेहनत घेतली.प्रामुख्याने उपस्थित नागपुर तालुका अध्यक्ष श्री.दिपक ठाकरे,वाडी शहर अध्यक्ष श्री.धनराज गिरीपुजे, नागपुर तालुका उपाध्यक्ष राकेश चौधरी,वाडी शहर उपाध्यक्ष श्री.सचिन सहारे,नागपुर तालुका उपाध्यक्ष प्रीतम कांम्पल्लीवार,नागपुर तालुका उपाध्यक्ष संतोष पाल,नागपुर तालुका सचिव सोमेश येथे,वाडी विभाग प्रमुख विठोबा घुरडे,वाडी शहर सचिव आकाश बाबर,युवराज गिरीपुंजे,नितीन पिटोरे,अजिक्य वाघमारे,शिवाजी नगर शाखा अध्यक्ष भोला सोनटक्के, उपाध्यक्ष राहुल कडुसले,सचिव बादल रामटेके,मनिष धिरडे, संगम मोर्या,जिवन मोहीते,दादु गायकवाड,सौरभ शेळके,अभिलाश सेलोकर,मनोज धिरडे,राजेश देशभ्रतार,प्रभुदास गिरीपुंजे,महादेवजी शेळके,रामाजी यादव,कपुर राहगंडाले,असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.