“महाराजांसमान नाही त्रिभुवनी” या दोन अंकी नाटकाचा 100 वा प्रयोग…11 फेब्रुवरीला सुरेश भट सभागृह तर 12 फेब्रुवरीला सेंटिफिक सभागृह येथे होणार
पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती
नागपुर WH न्यूज़ – प.पू.श्री . ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तत्वज्ञानावर आधारित “महाराजांसमान नाही त्रिभुवनी”या दोन अंकी नाटकाचा शतक महोत्सवी ( १०० वा ) प्रयोग कोरोनापुर्व काळात यशस्विरित्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला होता . मधल्या दोन वर्षाच्या काळात प्रयोग करता आले नाही . व्दिशतक पुर्ततेचा आमचा मानस आहे आणि त्या हेतुने आम्ही वाटचाल सुरू करीत आहोत , श्री ब्रह्मचैतन्य सेवा समिती प्रकाशित व रंग स्वानंद , नागपूर प्रस्तुत “महाराजांसमान नाही त्रिभुवनी” या नाटकाचे आयोजन वेद वासुदेव प्रतिष्ठान , पुणे यांनी शनिवार , दि . ११-२-२०२३ सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग , नागपूर येथे केले असल्याची माहिती रंगस्वानंद चे अध्यक्ष -वेद वासुदेव प्रतिष्ठान अजितदादा तुकदेव यांनी राम नागर येथील राम मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली. या नाटकाचे याचे लेखक उदयन ब्रह्म व दिग्दर्शक किशोर आयलवार ही यावेळी उपस्थित होते.
कौटुंबिक आणि उपस्थित प्रत्येक रसिकांना आपलेच असे वाटणारे हे नाटक असून वैशिष्ठ म्हणजे एकशे एकाव्या ( १०१ ) प्रयोगापासून प्रसिध्द किर्तनकार श्री चारुदत्त आफळे ( किर्तनसम्राट ) महत्वाची भूमिका वठविणार आहेत . इतर कलावंत मंजुषा देव , किरण देशपांडे , अशोक आग्रे , भारती जोशी , प्रकाश पाठक , मधुरा सामक , क्षितीजा रावदेव यांच्या भूमिका असून नेपथ्य – सतीश काळबांडे , संगीत सुशील सरोदे व पुजा भिडे , प्रकाश योजना – मंगेश विजयकर , ध्वनि एकनाथ काटकर , रंगभूषा शुभांगी सरोदे यांची असून गायक चारुदत्त आफळे , योगेन्द्र रानडे , गौरी परसतवार , संवादिनी मनोहर अय्यर , तबला- रघुनंदन परसतवार आहेत . निर्मिती प्रमुख गोपाळराव कुळकर्णी , प्रसिध्दी प्रमुख नरेंद्र इंगळे , समीर भालेराव आहेत .
प्रिया आयलवार व १०१ वा प्रयोग – शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ७ वाजता – कविवर्य सुरेश भट सभागृह , रेशिमबाग , नागपूर ( प्रवेश निःशुल्क ) रविवार , १२ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५ वाजता – सायंटिफिक सभागृह , लक्ष्मीनगर , नागपूर येथे होणार आहे.
१०१ व्या नाट्य प्रयोगा दरम्यान महाराजांसमान नाही त्रिभुवनी या नाटकाच्या पुस्तकाचे व्दितीय आवृत्तीचे प्रकाशन समारंभ सोहळा रसिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . १०२ वा प्रयोग आहे नागरिकांनी या नाटकाला बघण्याचे आव्हान आयोजकांनी केले.
आयोजित पत्र परिषदेला चारुदत्त आफळे , उदयन ब्रह्म , किशोर आयलवार , गोपाळराव कुळकर्णी , नरेंद्र इंगळे , समीर भालेराव , रवि वाघमारे , राजीव कोलते , बावडेकर आणि नाटकातील सर्व कलावंत उपस्थित होते.सूत्र संचालन पत्रकार स्नेहल जोशी यांनी केले.