महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकाचे विमोचन
नागपूर – के.एस.पानतावणे सर लिखीत महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकाचे विमोचन आज हिंदी मोर भवनाच्या अर्पणा सभागृहात पार पडलं या कविता संग्रहात दलित शोषीत, कामगारांच्या वेदनेच्या हुंकार सरांनी आपल्या लिखाणातून वेशीवर टांगून सरळ रेषेत शब्द अधोरेखित केले ज्याला कवि मनाची गंध नाही आणि मुक्त छंद नाही असा माणूस जेव्हा आपल्या अंतःकरणातून काव्यसंग्रह करतो तेव्हा ती कविता नसून परिवर्तनाची नांदी ठरते असे प्रतिपादन आंविमो आणि रिपब्लिकन एज्युकेशन फोर्स चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी केले ते महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकाचा विमोचन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय डोंगरे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ फुलचंद रामटेके, सुप्रसिद्ध साहित्यिक तन्हा नागपूरी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, समीक्षक बंलवत भोयर हे होते वंचित आघाडीचे रवी शेंडे, दिनेश बनसोड यांनी पानतावणे सरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा रमेश दुपारे यांनी केले आयोजन आंबेडकरी विचार मोर्चा चे राजू पांजरे यांनी केले या प्रसंगी सरांच्या सुकन्या हर्षवर्धनी डॉ संवर्धनी आणि त्यांच्या पत्नी रेखा पानतावणे यांना आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते मानचिन्ह आणि भारतीय संविधानाचे पुस्तक देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश कांबळे, धर्मा बौद्ध बागडे, दादाराव पाटील, प्रविण आवळे, सुधाकर बोरकर, भाऊराव बोरकर,गुलू डक्हा के.टी.कांबळे , यांनी अथक परिश्रम घेतले.