हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्प ऑकटोबर मध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न     -राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावाटची भर पडणार -भुसावळ संच हा महानिर्मितीचा चवथा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच

spot_img

 

महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्प ऑकटोबर मध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न     -राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावाटची भर पडणार
-भुसावळ संच हा महानिर्मितीचा चवथा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच

मुंबई २४ मे २०२३ : महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट संच क्रमांक ६ चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम (BHEL) मेसर्स भेल कंपनी करीत असून या कामांना अधिक जलद गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी आज दिल्ली येथे भेल कंपनीचे सी.एम.डी. डॉ.नलिन शिंघल यांची भेट घेतली.

महानिर्मितीच्या भुसावळ संचाचे बाष्पक प्रदीपन ३० मार्च २०२३ रोजी संपन्न झाले, त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा संच माहे ऑक्टोबर २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.नलिन शिंघल यांनी सांगितले.

Advertisements

मेसर्स भेल आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकित भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील वीज प्रकल्प, विद्युत उत्पादन क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते निकष, पर्यावरणीय ऱ्हास आणि घडामोडी अश्या ज्वलंत विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात मेसर्स भेल कंपनीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ.पी.अनबलगन यांनी भेल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

महानिर्मिती आणि मेसर्स भेल कंपनी यांचे मागील चार दशकांपासून असलेले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता आवश्यक ते संपूर्ण सहकार्य महानिर्मितीकडून भेल कंपनीला करण्यात येईल असे डॉ.पी.अनबलगन यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वीज क्षेत्राच्या दृष्टिकोनातून भुसावळ ६६० मेगावाट हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून यावर्षी राज्याच्या ग्रीडमध्ये ६६० मेगावाटची भर पडणार आहे. भुसावळ मधील ६६० मेगावाट क्षमतेचा पहिला आणि कोराडीच्या ३ संचांनंतर हा महानिर्मितीचा चवथा संच आहे.

Advertisements

या प्रसंगी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मरावीम सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.