हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मनसे नेत्यांचा  कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश… इंजिनचे डबे घसरतच चालले ?राज ला भाजपा चा झटका

spot_img

मनसे नेत्यांचा  कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश… इंजिनचे डबे घसरतच चालले ?राज ला भाजपा चा झटका

नागपुर :राज ठाकरे ज्या भाजपाचे गुन गान करतात त्याच भाजपाने नागपुरात त्यांच्या इंजिनचे महत्वाचे चाके आपल्या भाजपा गाडिल बसवले…मनसे च्या शकड़ो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला.

मनसे मध्ये ज्या आशेने व अपेक्षेने १७ वर्षापूर्वी मनसेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरवात केली, त्या सर्व आशा अपेक्षा फोल ठरल्या, नवनिर्माणाचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहिले, अनेक वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील सप्टेंबर महिन्यात नागपूर ला आले होते. त्यानंतर तरी सुधारणा होईल असे वाटले होते. मात्र झाले उलटेच त्यांच्या दौऱ्या नंतर पक्षातील वातावरण अजून गडूळ झाले, त्यातल्या त्यात पक्षाचे काम प्रामाणिक पणे करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणे व जनमानसात चांगली प्रतिमा नसणाऱ्या लोकांना पदे दिली जात होती, हे सर्व बघून ज्या उत्तर नागपुरातील आम्ही रहिवाशी आहोत त्या एकेकाळच्या मागास भागाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या देशाचे नेते मा. नितीनजी गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने आम्ही प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निश्चय केला.

Advertisements

त्यानुसार दोन दिवसा अगोदर नागपुरात गोधनी रोडवरील गोविंद लॉन येथे भाजप कार्यकारिणी बैठकीच्या वेळी प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे प्रभारी माजी आमदार चैनसुख संचेती, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, उत्तर नागपूर अध्यक्ष संजय चौधरी, प्रभाकर येवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला, आमच्या सोबत उत्तर नागपुरातील 35 युवकांनी त्याच दिवशी प्रवेश घेतला असून येत्या काही दिवसात अजून काही कार्यकर्ते प्रवेश करतील, प्रवेश करणाऱ्या दिनेश ईलमे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नागपूरचे जिल्हा अध्यक्ष पदावर तर महेश माने हे मनसेच्या मेन विंगचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष होते.

यापुढे भाजपच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नागपुरातील जनतेच्या समस्या सरकारच्या मदतीने मार्गी लावण्यासाठी व सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, दिनेश इलमे व महेश माने यांचे सोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे मनोज काहळकर, अश्वजीत गजभिये, राजू वैद्य, सुमित खानचांदाणी, विपुल नगराळे, राम हेडाऊ, किशोर भोयर, प्रकाश बोंद्रे, कुंजीलाल सहारे, प्रभाकर वाडेकर, शिवाजी गंधे, चेतन देशमुख, रामजी तिवारी, रितेश पाटील, सोमेश्वर यादव, पप्पू शेंडे, गणेश शिर्के, दीप प्राजी, अभय सोनटक्के, करण पणकूले, संतोष समुद्रे, थॉमस एक्सवेअर, भागिनाथ बारापात्रे, मोरेश्वर निनावे, गणेश पवार, विपुल नगराळे, सुनील वैद्य, बाबलूसिंग ढिल्लोन आदी उपस्थित होते.