हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भीम जयंती च्या दिवसी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आमदार,ख़ासदार यांना 2024 ला घरी पाठवू  ..! हजारों भीमसैनिक खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले…..लोकसभा विधानसभा निवडणुक राणा दाम्पत्यांस जाणार भारी

spot_img

भीम जयंती च्या दिवसी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आमदार,ख़ासदार यांना 2024 ला घरी पाठवू  ..! हजारों भीमसैनिक खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले…..लोकसभा विधानसभा निवडणुक राणा दाम्पत्यांस जाणार भारी

अमरावती -भीम सैनिकावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या राणा दम्पत्या विरुद्ध अमरावती मध्ये आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात मोठे आन्दोलन उभारले.मंगळवारी 2 में ला जिल्हाधिकारी कार्याल्यावर भीम सैनिक धड़कले.2014 च्या निवडणुकीत राणा दाम्पत्य आंबेडकरी जनता व मुस्लिम मतांच्या भरोषावर लोकसभा व विधानसभेत पोहचले.आता मात्र ती वाट दोघांनाही सहज राहली नाही.

भीम सैनिक राजेश वानखडे व इतर कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे जे दाखल केल्या गेले ते मागे घेण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यास प्ररावृत करणारे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा  यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली.

Advertisements

राणा दाम्पत्याचा विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. हातात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधातील प्ले कार्ड  घेवून, तर दुसरीकडे हातात निळे-भगवे झेंडे  घेवून मोर्चेकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत धिक्कार जनआक्रोश मोर्चा काढला. यामध्ये सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेले होते.

भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे व इतर कार्यकर्त्यांवर भारतीय दंडसंहिता १९६० नुसार कलम ३५४, १४३, ५०१, १४९, २९४, ३४१, व ५०९ हे दाखल केलेले खोटे गुन्हे १५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. हे खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यासाठी १७ एप्रिल रोजी मा. पोलिस आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनाची गंभीर दखल न घेता तसेच अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने सर्व आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या भीमसैनिकांची तीव्र नाराजी होती.

खासदार व आमदार या संवैधानिक पदावर कार्यरत असतांना शेतकरी आत्महत्या, कुपोषण, रोजगार, महागाई, सरकारी शिक्षणाच्या व आरोग्याच्या समस्यांना प्राधान्य न देता केवळ दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा प्रयत्नशील असतात असेच त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीतुन दिसत आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी संवैधानिक पदाचा गैरवापर करून साक्षी राजेश उमक, मिराताई कोलटके, वनिता तंतरपाडे या तिघींना विनोद गुहे याने गाडगे नगर पोलीस स्टेशन अमरावती येथे सोबत आणुन त्यांच्या हस्ते हेतूपुरस्सर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

१३ व १४ एप्रिल २०२३ रोजी इर्विन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतांना कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करणे अत्यंत चुकीचे आहे. या सर्व प्रकरणाचा रोष आज मोर्चात पहायला मिळाला.
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या कार्यशैलीचा इतिहास बघता असे दिसते की, खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करुन अनुसूचित जातीच्या लोकसभा मतदार संघावर डल्ला मारला त्यामुळे ख-या अनुसूचित जातीच्या उमेदवारास वंचित ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करुन अमरावती मनपा आयुक्त यांच्यावर शाईफेक करण्यात आली. रागाने मुलगी घरुन निघुन गेली असता या घटनेला लव जिहादचे प्रकरण करुन राजापेठ पोलिस स्टेशन मध्ये पोलिसा़चा अपमान केला आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, १५ एप्रिल ला राजेश वानखडे व इतर भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करुन भीम जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १४ एप्रिल हा दिवस म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा आम्हाला प्रेरणा देणारा दिवस आहे. त्याच दिवशी विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करणे हे आम्हाला कधीही मान्य नाही. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेकरं आहोत, अन्यायाविरोधात जाहीर बंड करून संवैधानिक पद्धतीने न्याय मिळवण्यासाठी आज अमरावती मध्ये हजारोंच्या संख्येने  खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात धिक्कार जनआक्रोश मोर्चात सामील नारेबाजी केली.शासन व प्रशासनाकडुन न्याय मिळेल अशी अपेक्षाच आन्दोलकांना आहे.  भीमसैनिक राजेश वानखडे व इतर यांचावर भारतीय दंड संहिता १९६० नुसार कलम ३५४, १४३, ५०१, १४९, २९४, ३४१, व ५०९ हे दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच खोटे गुन्हे दाखल करण्यास प्ररावृत करणारे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व इतर यांच्यावर कोणाच्याही दबावाखाली काम न करता संवैधानिक पद्धतीने आम्हाला न्याय देवुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन अटक करण्यात यावी. धिक्कार जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थिती नागरिकांनी केली