हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले ◼️वडसा-कोहमारा मार्गावरील घटना

spot_img

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

◼️वडसा-कोहमारा मार्गावरील घटना

गोंदिया, : वडसाकडून राजनांदगावकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र मनोहर नेवारे ( वय 32 रा. येगाव) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात वडसा- कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक 275 वर संभाजीनगर ते तावशी खुर्द दरम्यान गुरुवारी (ता.21) दुपारच्या सुमारास घडला. मृतक जितेंद्र हा अर्जुनी मोरगाव येथून येगावकडे जात होता. तर ट्रक क्रमांक सी जी 08 ए एक्स 9661 हा हैद्राबाद येथून मका घेऊन राजनांदगाव येथे जात असताना दोन्ही वाहनात जबर धडक झाल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे अवयव रस्त्यावर पडले होते.अपघात झाल्यानंतर ट्रक वेगाने कोहमारा मार्गाने पळून गेला. मात्र, त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गौरनगर येथे नाकाबंदी तपास करून पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे घटनास्थळी आले असता त्यांनी नवेगावबांध व नजीकच्या सर्व पोलीस ठाण्यांना सूचना केली. आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या दिशेने रवाना केले. दरम्यान, कोहमारा रस्त्यावर ट्रकचा शोध घेत असताना देवलगावजवळ भरधाव वेगाने पळून जाणारा ट्रक निदर्शनास आला. त्याची तपासणी करून ट्रक अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात आणून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ट्रकचालक पोमेंद्रकुमार माणिकराव साहू (22) रा राजनांदगाव याचेविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.आरोपी विरुद्ध कलम 279,304 (अ), भा द वि,सहकलम 134 (अ) (ब),184 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील नलावडे करीत आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मृतक जितेंद्र याच्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
@WH न्यूज़ वृत्त सेवा गोंदिया