भक्ती क्षीरसागर ला स्केटिंग मधे 3 सुवर्ण , मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड
नागपुर : पणजी ,गोवा येथे पार पडलेल्या 36 व्या अखिल भारतीय रोलर रिले स्केटिंग चैंपियनशिप स्पर्धेत भक्ति प्रदीप क्षीरसागर नागपुर हिला वेगवेगळ्या वर्ग श्रेणी मधे 3 सुवर्ण पदक मिळाले असून तिची मलेशिया येथील मलक्का येथे दिसेम्बर महिण्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे.
नागपुर च्या भारती कृष्ण विद्या विहार शाळेची विदयार्थिनी श्री शिवाजी स्केटिंग क्लब गांधी नगर नागपुर च्या वतीने भक्ति ने पणजी येथे दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धे मधे भाग घेतला होता ,त्यात देशभरातुन विविध राज्यातील खेलाडुनी सहभाग घेतला होता , त्यात उत्कृष्ट कामगिरी करत भक्ति हिने 3 सुवर्ण पटकावले आहे ,त्याचे श्रेय भक्ति हिने कोच कृष्णा बैसवारे यांना दिले आहे