प्रेस नोट
बेसा ते मनिष नगर टी पॉइंट वर 5 फूट पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात जय जवान जय किसान संघटनेचे आंदोलन..! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नारेबाजी ,खड्डे बुजवा नाहीतर आन्दोलन अभिनव फटींग
नागपुर -नागपुर स्मार्ट सिटीचा गाजवाज़ा देश भर केल्या जात् आहे मात्र वास्तविक चित्र क़ाय आहे हे दाखविन्याचा प्रयत्न जय जवान जय किसान संघटन चे अभिनव फिटिंग यांनी केला…चक्क खड्या जवळच बेंनर झळकवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
बेसा ते मनिष नगर टी पॉइंट येथे सिमेंट रोडवर महिनाभरा पासून 5 फूट खोल खड्डा पडून अनेक अपघात झाले असून या विरोधात जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली. जाहिराती वर करोडो रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे खड्डे बुझवण्याकरिता पैसे नाही का ? हा प्रश्न उपस्थित होतो. 2019 ला या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. 20 ते 25 वर्ष टिकणारे सिमेंट रस्त्यावर खड्डे पडतात कशे याची चौकशी झाली पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे असा संघटनेचा आरोप आहे.
बेसा ते वेळाहरी पर्यंत 24 मीटर रोड मंजूर असताना 20 मीटर बांधण्यात येत आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात वाढेल या दुमत नाही, सार्वजनिक बांधकाम विभाग मनमानी काम करीत असून सामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. बेलतरोडी येथील एक परिवार लग्न समारंभातुन परत येत असताना या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले याची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेईल का? जनतेला वेठीस धरण्याचे काम विभाग करत असल्याचे यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे सहसचिव अभिनव फटींग व नीलिकेश कोल्हे यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमाणे नगर पंचायत बेसा यांची सुद्धा जवाबदारी असून सुद्धा या खड्ड्या कडे दुर्लक्ष करीत आहे. बेसा, पिपला, बेलतरोडी, वेळा हरिश्चंद्र कडे जाणाऱ्या नागरिकाची वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूक जाम ची समस्या निर्माण होत असल्याने जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने हे निदर्शने करण्यात आली.