बुद्धम शरनमः गच्छामि, जय भीमच्या जयघोषाने बिहार दुमदुमले…थायलंड येथील १००, महाराष्ट्रचे १०० भिख्खूचा धम्मपद यात्रेत समावेश….तथागत बुद्धांच्या ऐतिहासिक स्थळाचे घेतले दर्शन….दीक्षाभूमी ते लेह-लद्दाख देशातील पहिली ऐतिहासिक धम्मपद यात्रा
बुद्धगया बिहार (नयन मोंढे ) तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखदरम्यान धम्म पदयात्रेचे आयोजन थायलंडचे मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांच्या नेर्तृत्वात नागपूर येथिल दीक्षा भूमी येथुन लेह लदाख ला रवाना झाली. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बिहार येथील राजगिरी पोहोचली असून राजगिरी ते बौद्ध गया पदयात्रा बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम संगम शरणम् गच्छामि व जय भीम च्या घोषणेने बिहार दुमदुमले.
वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचे औचित्य साधून गगन मलिक फाउंडेशन, आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखपर्यंत देशात पहिल्यांदा च धम्मपद यात्र देशभर भ्रमण करीत आहे.
मंगळवार ता ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजता राजगीर ला पोहचली. राजगीर येथिल वेलूवन येथे येथे श्रामनेर झालेल्या सर्वसामान्यांचे उपसंपदा थायलंड येथील भिकू संघाच्या नेतृत्वात करण्यात आली. थाई मॉनेस्ट्री (बुद्ध विहार) येथे तीन मुक्काम करून राजगीर परिसरात तथागत गौतम बुद्धांच्या पावलांनी पावन झालेल्या भूमीत तेल विविध ठिकाणी भिकू संघाने भेटी देऊन दर्शन घेतले.वेणुवन ते बुद्धगया धम्म पदयात्रा दर्या खोऱ्यातून मार्गक्रमण करीत बुद्धगया पोहोचली यावेळी मार्गात लागलेले राजा बिंबिसार यांना त्यांच्याच मुलाने तुरुंगात कैद करण्यात आले होते त्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर तत्कालीन काळात अवाघमन ना साठी असलेल्या बैलगाड्या चा मार्ग त्याचे निरीक्षण भिकू संघाने केले थोडी विश्रांती घेत पदयात्रेला सुरुवात झाली इचीकूट पर्वत येथे तथागत बुद्धांनी चे शिष्यांनी ध्यान साधना केली त्या उंच पर्वतावर भिकू संघाने त्या ठिकाणी जाऊन वंदन केले.
20 20 किलोमीटर चा प्रवास झाल्यानंतर पुन्हा एका मॉनेस्ट्रीमध्ये रात्रभर विश्रांती केल्यानंतर धम्मपद यात्रा बौद्ध गायकडे मार्गस्थ झाली. तथागत बुद्धांनी गिजीकूट पर्वतातील गुफेत तब्बल सहा वर्ष ध्यान साधना केली त्या ठिकाणी संघाने जाऊन थायलंड येथील ज्येष्ठ बनते यांच्या नेतृत्वात वंदना घेतली व पुढे बुद्धगयेच्या प्रवासाला निघाली. 80 किलोमीटरचा पायदळ प्रवास करून तीन दिवसानंतर धम्मपद यात्रा बौद्धगयेला पोहोचली त्या ठिकाणी वाट थाई मॉनेस्ट्री येथे तीन दिवस मुक्काम करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथे थायलंड येथील भिकू संघाचे जेष्ठ भदंत त्यांच्या नेतृत्वात बोधिवृक्ष तसेच विहारातील बौद्ध मूर्ती समोर बुद्ध वंदना करण्यात आली बौद्धगया परिसरातील विविध स्थळांना भेटी देण्यात आल्या निरंजना नदीच्या पात्रात थायलंड येथील ज्येष्ठ भदंत यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या थायलंड महाराष्ट्रातील सर्व भिक्षूंना धम्मदेशना दिली व सविस्तर माहिती सांगितली.
त्यानंतर उत्तर प्रदेशातील सारनाथ,व त्यानंतर श्रावस्ती येथे धम्म पदयात्रा पोहोचणार.त्या परिसरातील तथागत बुद्धांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या विविध बौद्ध स्थळांना भेटी देण्यात येणार असून त्यानंतर धम्म पदयात्रा दिल्ली मार्गे धर्मशाला पोहोचेल येथून दोन महिन्यांचे धम्मपद यात्रेला सुरुवात होईल. या धम्मपद यात्रेत भारतातील १०० तर थायलंडचे १०० भन्ते सहभागी आहेत. ही धम्म पदयात्रा १५ जुलै रोजी लेह-लद्दाख येथे पोहोचेल व तेथे समारोप होईल. धम्मपद यात्रेला यशस्वी करण्यासाठी थायलंड येथील
भन्ते कंतराथान भन्ते प्राखंती बरोम, भन्ते थियाछयो, भन्ते प्रार्थनासून, चीतिको भिकू, प्रहरा महाछाटवना यांच्यासह गगन मलिक फाउंडेशनचे नितीन गजभिये, स्मिता वाकडे धम्म पदयात्रा अथक परिश्रम घेत आहेत.